“इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज महाग”; जयंत पाटलांनी थेट आकडेवारी मांडत केली मोठी मागणी

Jayant Patil | राज्यात महायुतीला मोठा यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. यातच विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सर्वाधिक वीज महाग असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संपूर्ण आकडेवारीच मांडली आहे.
जयंत पाटलांची पोस्ट
जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत महायुतीच्या नेत्यांनी दिलेल्या आश्वासनाकडे लक्ष वेधले आहे. जयंत पाटील म्हणाले, “वीज बिलात ३०% कपात करणार असे महायुती सरकारमधील लोकं मागच्या ४-५ महिन्यांपासून म्हणत आहेत. ३०% कपात सोडाच पण इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्रात सध्या वीज महाग मिळत आहे.” Jayant Patil |
वीज बिलात ३०% कपात करणार असे महायुती सरकारमधील लोकं मागच्या ४-५ महिन्यांपासून म्हणत आहेत. ३०% कपात सोडाच पण इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्रात सध्या वीज महाग मिळत आहे.
राजस्थानमध्ये प्रति युनिटला ७.५५ – ८.९५ रुपये मोजावे लागत आहेत, तर मध्य प्रदेशमध्ये ३.३४ ते ६.८० रुपये…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) December 11, 2024
पुढे ते म्हणाले, “राजस्थानमध्ये प्रति युनिटला ७.५५ – ८.९५ रुपये मोजावे लागत आहेत, तर मध्य प्रदेशमध्ये ३.३४ ते ६.८० रुपये मोजावे लागत आहेत. शेजारच्या कर्नाटक राज्यात तर सरसकट प्रति युनिट ५.९० रुपये आहेत. सर्वात जास्त वीजदर म्हणजे प्रति युनिट ५.१६ ते १७.७९ रुपये महाराष्ट्रात मोजावे लागत आहेत.” Jayant Patil |
….आता सरकारला कोणतीही अडचण नसावी
वीज बिलात ३०% कपात करणार, पाच वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असे म्हणणारे आज प्रचंड बहुमताने सत्तेत बसले आहेत. सध्या राज्यात असलेले अवाढव्य वीजदर कमी करण्यात आता सरकारला कोणतीही अडचण नसावी,” असा टोलाही जयंत पाटील यांनी राज्य सरकारला लगावला आहे. Jayant Patil |
हेही वाचा:
पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निबंध लिहिणे पडले महागात ; अमेरिकेत भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याचे निलंबन





