विद्युत विभागाचा “झोल’ उघड पालिकेचे 40 कोटी वाचले

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात 36 हजार 134 एलईडी बसविण्याकरिता केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ईईएसएल कंपनीला 73 कोटी 50 लाख रुपये देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेसमोर होता. परंतु नगरसेवक संदीप वघेरे यांनी सर्वसाधारण सभेत महापालिका विद्युत विभागाचा झोल उघड करून आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लक्ष घालण्यास सांगितले. त्यानुसार आता या कामात सुधारणा होऊन सुमारे 34 कोटी 29 लाख रूपयांचा नवीन ठराव आज (बुधवारी) स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला. त्यामुळे महापालिकेची 39 कोटी 50 लाख रुपयांची बचत झाली आहे.

महापालिकेच्या वतीने शहरातील एकूण दिव्यांची संख्या 74 हजार 889 आहे. यापूर्वी ईएलडी बसविण्यात आलेल्या दिवाबत्तीची संख्या 38 हजार 755 आहे. नव्याने एलईडी बसविण्यात येणाऱ्या दिव्यांची संख्या 36 हजार 134 आहे. वार्षिक दिवाबत्तीचे वीज बिल अंदाजे 27 कोटी 39 लाख रुपये (सर्व दिवे चालू स्थितीत गृहीत धरून) ईईएसएलमार्फत इस्क्रो तत्वावर (कॉस्ट रोअरिंग बेसडे) जुने पारंपरिक फिटिंग काढून एलईडी फिटिंग बसविण्यात येणार आहे. या कामाकरिता 3 टक्के सल्लागार फी, देखभाल दुरूस्ती खर्च 4 टक्के, पायाभूत सुविधा खर्च 10 टक्के असे एकूण 7 वर्षात 73 कोटी 50 लाख खर्चास मंजुरीचा विषय 20 डिसेंबर 2018 रोजीच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला होता. या विषयावर चर्चा करताना संदीप वाघेरे यांनी या कामासाठी प्रत्यक्ष खर्च 30 कोटीच येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.