दर महिन्याला निवडणुका घ्याव्यात; इंधन दरवाढीवरून सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर निशाणा
Updated On:

नवी दिल्ली -राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी लोकसभेत इंधन दरवाढीवरून केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला. केवळ निवडणुकाच इंधनांचे दर नियंत्रणात ठेऊ शकतात. त्यामुळे दर महिन्याला निवडणुका घ्याव्यात, अशी उपहासात्मक मागणी त्यांनी केली.
सुप्रिया यांनी लोकसभेत शून्य प्रहरावेळी इंधन दरवाढीचा मुद्दा उपस्थित केला. भाजपने पाच पैकी चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांत विजय मिळवला. मात्र, त्या निवडणुकांची प्रक्रिया संपताच इंधन दरवाढ झाली. दर महिन्याला निवडणुका झाल्यास त्यामध्ये भाजप व्यस्त राहील.
त्यामुळे इंधन दर नियंत्रणात राहण्याची निश्चिती होईल, अशी शाब्दिक टोलेबाजी त्यांनी केली. निवडणुकांआधी बराच काळ इंधन दर जैसे थे राहिले होते. त्याचा संदर्भ सुप्रिया यांनी दिला.





