Election Result 2022 : अखिलेश यादव यांचे ट्विट म्हणाले, परीक्षा अजून बाकी आहे…
Updated On:

उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीची मतमोजणीस सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान पूर्वांचलमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे चित्र आहे. मतमोजणी सुरू असून अशातच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट केले आहे.
अखिलेश यादव यांनी ट्विट केले की, अजून परीक्षा बाकी आहे, आता धैर्याची वेळ आली आहे, सपा-गठबंधनच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे, समर्थकांचे, नेत्याचे, पदाधिकारी आणि हितचिंतकांचे मतमोजणी केंद्रांवर रात्रंदिवस जागरुक व जाणीवपूर्वक कार्यरत राहिल्याबद्दल मनःपूर्वक आभार! ‘लोकशाहीचे शिपाई’ विजयाचे प्रमाणपत्र घेऊनच परतले! असे ट्विट त्यांनी केले आहे.





