भरत मुंडे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड
Updated On:

पुणे – बहुजन विद्युत अभियंता अधिकारी आणि कर्मचारी फोरमच्या प्रदेश उपाध्यक्षपदी भरत मुंडे यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय अध्यक्ष शिवाजी वायफळकर यांनी मुंडे यांची निवड केली.
भरत मुंडे हे परळी तालुक्यातील डाबी गावचे आहेत. त्यांनी याआधी परिमंडळ अध्यक्ष, तसेच प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य म्हणून काम केले आहे. कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध मुंडे यांनी आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे. तसेच पदोन्नती आणि बदल्या इत्यादी कामे संघटनेच्या माध्यमातून केलेली आहेत.





