Uddhav Thackeray | देशासह राज्यात सध्या लोकसभ निवडणुकीची जोरदार सुरू आहे. नुकतेच 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. यातच आता निवडणूक आयोगाकडून शिवसेना ठाकरे गटाला नोटीस बजावण्यात आली आहे. मशाल गीतात “भवानी” शब्द आल्याने निवडणूक आयोगाने नोटीस पाठवत हा शब्द हटवण्यास सांगितले आहे. मात्र निवडणुक आयोगाची ही नोटिस धुडकावत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
ठाकरे गटाच्या प्रचार गीतातून जय भवानी, हिंदू धर्माचा उल्लेख असलेले शब्द काढा, असे सांगण्यात आल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. याबाबत आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून उघडपणे हिंदुत्वाचा प्रचार सुरु आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदी-शाहांचा व्हिडीओ दाखवला. तसेच उद्धव ठाकरे मशाल गीतातून भवानी शब्द हटणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले. Uddhav Thackeray|
भवानी माता सर्व जनतेची माता आहे, तिचं स्मरण करण्यापासून आम्हाला कुणी रोखू शकत नाही. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. आमच्या गीतातून धार्मिक प्रचार होत असेल, तर मोदी आणि शाहांच्या धार्मिक प्रचार करणाऱ्या वक्तव्यावर आधी कारवाई करा. आमचं सरकार आणल्यावर प्रभू श्रीरामाचं दर्शन मोफत करु. बजरंग बलीचं नाव घेत पंतप्रधान मोदींनी प्रचार केला. हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या मोदी-शाहांवर आधी कारवाई करा, असं उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला उद्देशून म्हटलं आहे. Uddhav Thackeray|
मोदी-शाहांना हवं ते बोलता येतं, मग आम्हाला का नाही. मोदी बजरंग बली की जय म्हणत बटण दाबा म्हणतात, शाह म्हणतात आम्हाला निवडून दिलं तर, रामलल्लाचं मोफत दर्शन देऊ. निवडणुकीत धर्माच्या नावाने मते मागता येत नाहीत, मग मोदी-शाहांना वेगळा नियम का? अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी देवाच्या नावावर मते मागतात. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. त्यावर अद्याप निवडणूक आयोगाचं उत्तर आले नाही. ते हिंदू धर्मावर मते मागतात. आम्ही हिंदू धर्माच्या आधारावर मत मागितलं नाही.