Election Commission : विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाने केला ‘हा’ मोठा खुलासा

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर ईव्हीएम मशीनवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात शंका उपस्थित करण्यात आली. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात देखील महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करत मोठा गोंधळ घातला होता. यादरम्यान माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी गावातील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली होती. या सगळ्या वादावर आता निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे.
PRESS NOTE@ECISVEEP @SpokespersonECI pic.twitter.com/LyeINzEV00
— ChiefElectoralOffice (@CEO_Maharashtra) December 10, 2024
काय म्हणाले निवडणूक आयोग?
निवडणूक आयोगाने या सगळ्या वादावर स्पष्टीकरण देताना म्हंटले कि VVPAT मशिनमधील मोजणीत कुठेही तफावत नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. त्यामुळे, ईव्हीएमच्या आरोपात कसलेली तथ्य नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हंटले आहे. 23 नोव्हेंबर रोजीच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील निवडलेल्या 5 मतदान केंद्रांची VVPAT स्लिप मोजणी 23/11/2024 रोजी मतमोजणी निरीक्षक/उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर करण्यात आली आहे.
त्यानुसार, महाराष्ट्र राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील 1440 VVPAT युनिट्सची स्लिप गणना संबंधित कंट्रोल युनिट डेटासह केली गेली आहे. संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणजेच DEOs कडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार VVPAT स्लिपचा काउंट आणि EVM कंट्रोल युनिट काउंटमधील आकडेवारी समसमान आहे. त्यामध्ये, कोणतीही तफावत आढळलेली नाही. त्यामुळे, मतमोजणीच्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे व प्रक्रियेचे योग्य पालन करण्यात आले आहे, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.





