Eknath Shinde : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? भरत गोगावलेंचा मोठा दावा; मुख्यमंत्रिपदासाठी दिल्लीकडे बोट
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २०२९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा खळबळजनक दावा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे.

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २०२९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील, असा दावा शिवसेनेचे नेते आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय दिल्लीतील नेतृत्वाच्या हातात असल्याचे सूचक विधानही गोगावले यांनी केले. (Eknath Shinde)
भरत गोगावले यांनी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत आपली भूमिका मांडली. (Eknath Shinde)
‘अंतिम अधिकार दिल्लीचा’
गोगावले म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशी जनतेची भावना आहे. आम्हालाही ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असे वाटते. मात्र, दिल्लीवरून जी सूत्रे हलतील, त्यानुसार पुढील निर्णय होईल. दिल्लीतील नेतृत्वाने ठरवले तर काहीही होऊ शकते. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा बदल होईल, असे आम्हाला वाटते, असे सूचक विधान त्यांनी केले. (Eknath Shinde)
महायुतीतील नाराजीवरही भाष्य
महायुतीमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांची, पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची गळचेपी होत असल्याच्या तक्रारींबाबतही गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली. आपल्याला तसे वाटत नसल्याचे सांगत त्यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण दिले. (Eknath Shinde)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये राज्य पातळीवर योग्य समन्वय असेल, तर कार्यकर्त्यांच्या पातळीवरही अडचणी निर्माण व्हायला नकोत, असे ते म्हणाले. गळचेपी करून घेणारे शिवसैनिक नसतात, अशी टिप्पणीही त्यांनी केली. (Eknath Shinde)
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर म्हणाले…
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत विचारले असता, राजकारणात कधी काय घडेल, हे सांगता येत नाही, असे गोगावले म्हणाले. सकाळी एखादी व्यक्ती कुठे असेल आणि दुपारी कुठे असेल, तसेच दुपारनंतर सायंकाळी काय घडेल, याचा अंदाज बांधता येत नाही, अशी राजकीय टिप्पणी त्यांनी केली. (Eknath Shinde)
दरम्यान, भरत गोगावले यांच्या या विधानामुळे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. गोगावले यांनी व्यक्त केलेली ही राजकीय शक्यता आहे. (Eknath Shinde)





