Eknath Shinde : इंडिया आघाडीचा न्यायव्यवस्थेवर दबावाचा प्रयत्न : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Eknath Shinde : सर्वोच्च न्यायालयावर काढण्यात आलेल्या मोर्चावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी इंडिया आघाडीच्या सर्वोच्च न्यायालयाकडील मोर्चावर टीका केली. हा न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. तसेच, देशात अराजकता आणि अस्थिरता पसरवणे हाच विरोधकांचा एकमेव अजेंडा असल्याचा आरोपही त्यांनी केला. (Eknath Shinde)
एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी विरोधकांनी माफी मागण्याची मागणी केली. निवडणुकीतील अनियमिततेविरुद्ध याचिका दाखल करण्यासाठी काढलेला हा मोर्चा म्हणजे सर्वोच्च न्यायालयावरील अभूतपूर्व हल्ला आणि भारतीय इतिहासातील एक काळा दिवस असल्याचे त्यांनी म्हटले. (Eknath Shinde)
सर्वोच्च न्यायालयाकडे काढलेला मोर्चा हा न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न होता. देशात असे पहिल्यांदाच घडले आहे. न्यायालयाकडून न्याय मागण्याचा विरोधकांना अधिकार असला, तरी याचिका दाखल करण्यासाठी मोर्चा काढणे हा सर्वोच्च न्यायव्यवस्थेवरील हल्ला आणि तिचा अपमान आहे. मी याचा निषेध करतो. त्यांनी १४० कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे, असे शिंदे म्हणाले. (Eknath Shinde)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी म्हटले होते की, लोकांनी चिकाटी ठेवावी आणि आंदोलन सुरू ठेवावे, कारण देश एका-दोन दिवसांत वाचवता येत नाही; तसेच त्यांनी या आंदोलनाचे वर्णन तांडव असे केले होते. शिंदे यांनी दावा केला की, शिवाच्या नृत्याचा संदर्भ देणे हा त्या देवाचा अपमान आहे. (Eknath Shinde)
जर शिवाने आपला तिसरा डोळा उघडला, तर इंडिया आघाडीचा विनाश होईल, अशी टिप्पणी त्यांनी केली. विरोधी पक्ष हताश झाला आहे. त्यांना काय करावे हेच सुचत नाहीये. गोंधळ व अस्थिरता निर्माण करणे आणि देशाच्या विकासात अडथळे आणणे हाच त्यांचा एकमेव अजेंडा आहे. अनेक परकीय शक्ती देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा शिंदे यांनी केला. (Eknath Shinde)
Eknath Shinde : राहुल गांधी यांनी देशातील 140 कोटी जनतेची माफी मागावी; एकनाथ शिंदे असं का म्हणाले?





