औरंगजेबावरील विधानामुळे राज्यात खळबळ! एकनाथ शिंदेची संतप्त प्रतिक्रिया ; म्हणाले,’अबू आझमी देशद्रोही…’

Eknath Shinde on Abu Azmi। समाजवादी पक्षाचे (सपा) आमदार अबू आझमी यांनी मुघल सम्राट औरंगजेब यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून राज्यात राजकीय गदारोळ सुरू झाला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सपानेते अबू आझमी यांच्याविषयी मत व्यक्त केले. त्यांनी यावेळी, “अबू आझमी हे देशद्रोही आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. त्यांना सभागृहातून निलंबित केले पाहिजे” अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. तसेच ते पुढे बोलताना, “औरंगजेबाने अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली होती, त्यांची स्तुती करणे अपमानास्पद आहे.” असेही त्यांनी म्हटले आहे.
अबू आझमी काय म्हणाले? Eknath Shinde on Abu Azmi।
समोर आलेल्या माहितीनुसार, अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते. महाराष्ट्रातील सपा प्रमुख अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक करून म्हटले होते की, औरंगजेबाच्या कारकिर्दीत भारताच्या सीमा अफगाणिस्तान आणि बर्मापर्यंत पोहोचल्या होत्या., “आपले सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) जागतिक जीडीपीच्या २४ टक्के होते आणि भारताला (औरंगजेबाच्या काळात) सोन्याची पक्षी म्हटले जात असे, त्यासोबतच त्यांनी कोणतेही मंदिर उद्धवस्त केले नाही उलट त्यांनी अनके मंदिरे बांधली होती.” असे त्यांनी म्हटले होते.
या विधानावर भाजप आणि शिवसेना हल्लाबोल करत आहेत. अबू आझमी यांच्या वक्तव्यानंतर लगेचच शिंदे यांनी कारवाईची मागणी केली. काही तासांनंतर, लोकसभा खासदार नरेश म्हस्के यांच्या तक्रारीवरून,आझमी यांच्याविरुद्ध शिंदे यांचा राजकीय बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला.
आज महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज सुरू होताच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि कारवाईची मागणी केली. विधानसभेबाहेर, सत्ताधारी पक्षाचे नेते अबू आझमी हे चित्रावर बूट मारताना दिसले.
अबू आझमींना तुरुंगात टाकायला हवे -संजय शिरसाट Eknath Shinde on Abu Azmi।
महाराष्ट्राचे मंत्री संजय शिरसाट यांनी अबू आझमी यांच्याविषयी बोलताना, “निलंबनाची कारवाई पुरेशी नाही, त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे. या क्रूर राजाची स्तुती करणारे औरंगजेबाची हरवलेली मुले आहेत. आम्ही सर्वत्र तक्रार केली आहे, त्याला तुरुंगात जावे लागेल.” असे म्हटले होते





