Dasra Melava BKC Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाईव्ह….

Updated On:

मुंबई –  बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या भाषणाला सुरूवात झाली आहे. सत्तेच्या हव्यासापोटी हिंदुत्वाच्या विचाराला उद्धव ठाकरेंनी मूठमाती दिली. बाळासाहेबांनी ज्यांच्यावर टीका केली, त्यांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली, त्यामुळं शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतली असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधत आपल्या भाषणाला सुरूवात केली आहे.

 एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे –

1. ही गर्दी पाहून खरी शिवसेना कुठं आहे याचं उत्तर उभ्या महाराष्ट्रालाच नाही तर भारताला मिळालं आहे – एकनाथ शिंदे

2. सत्तेच्या हव्यासापोटी हिंदुत्वाच्या विचाराला उद्धव ठाकरेंनी मूठमाती दिली. बाळासाहेबांनी ज्यांच्यावर टीका केली, त्यांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली, त्यामुळं शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतली – एकनाथ शिंदे

3. खरी शिवसेना कुठे आहे याचं उत्तर महासागरानं दिलं, मैदान मिळवलं, पण बाळासाहेबांचा विचार आमच्याकडे – एकनाथ शिंदे

4. आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, तुम्ही बापाचे विचार विकले, बापालाच विकण्याचा प्रयत्न केला’, बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही तिलांजली दिली, बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार हे शिवसैनिक आहे  – एकनाथ शिंदे

5. तुम्ही गद्दार, आम्ही गद्दारी केली नाही, बाळासाहेबांचे विचार सोडला तेव्हा आम्ही भूमिका घेतली. आमची भूमिका जनतेला मान्य, आम्ही निर्णय घेताना आनंदाने घेतला नाही, आम्हालाही वाईट वाटलं; आम्हाला गद्दार म्हणण्यापेक्षा तुम्ही आत्मपरीक्षण करा – एकनाथ शिंदे

6. गद्दारी नक्कीच झाली, पण आत्ता नाही 2019 मध्ये, आत्ता नाही

7. तुम्ही सत्तेसाठी लाचार झालात, आमचे विचार आम्ही बदलणार नाही. बाळासाहेबांनी ज्या पक्षाचा हरमाखोर असा उल्लेख केला, त्यांच्या दावणीला तुम्ही पक्ष बांधला. हे पाहून बाळासाहेबांच्या मनालाही वेदना झाल्या असतील.  – एकनाथ शिंदे

8. ‘मीच ग्रामीण भागातील आमदारांना भेटायचो,बाकी कुणीही नाही, पराभूत उमेदवारांना राष्ट्रवादी-काँग्रेस ताकत द्यायचे,मी हे ठाकरेंना सांगितलं’ – एकनाथ शिंदे

9. कोविड कोविड करुन तुम्ही सर्वांना घरात बसवलं, तुम्ही मंदिरं बंद केली, दुकानं बंद केली आणि तुमचचं एकटं दुकान सुरु होतं – एकनाथ शिंदे

10. राज्यातही पीएफआयला ठेचलं जाईल,पीएफआय (PFI) बाबत पंतप्रधान मोदी, अमित शाहांची भूमिका योग्यच .देश विघातक शक्तींना ठेचून काढणार. RSS वरील बंदीची मागणी हस्यास्पद, आरएसएसचं राष्ट्रउभारणीत महत्वाचं योगदान’ – एकनाथ शिंदे

11. संजयाच्या भरवशावर राहिल्यानेच हे महाभारत घडले. ‘आमदार, खासदार गेल्यानंतरही डोळे उघडत नाहीत’. – एकनाथ शिंदे

12. ‘काँग्रेस पक्ष आहे पण त्याला अध्यक्ष नाही, पंतप्रधानांची टिंगल करणाऱ्यांचं काय झालं?’  ‘मोदींना डिवचणारे आता कुठे आहेत?”मोदींना हिणवणाऱ्या पक्षाला आज अध्यक्ष मिळत नाहीए’. चहावाल्याची खिल्ली उडवली, ते पंतप्रधान आहे.’पंतप्रधानांनी देशाचं नाव जगात पोहोचवलं, मोदींची भुरळ जगाला आहे, बाळासाहेबांचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं’ अमित शाह यांनी ३७० हटवले, त्यांची टिंगल करताय?’- एकनाथ शिंदे

13. ‘एकनाथ शिंदे हा दिलदार माणूस आहे, शिवसेनेचा पाईक आहे’ .आम्ही गद्दार नाही, बाळासाहेबांचे शिलेदार आहोत, किती लोकांनी उद्धव ठाकरे यांना सोडलं याचा विचार करावा. राज ठाकरे, नारायण राणे तुम्हाला सोडून का गेलेत?,- एकनाथ शिंदे

14. ‘उद्धव ठाकरेंनी वर्क फॉर्म होम केलं, आम्ही वर्क विदाऊट होम केलं, सातच्या आत घरी जाण्याची शिवसैनिकांची संस्कृती नाही’ – एकनाथ शिंदे

15. बीकेसीवर प्रचंड गर्दी झालीय, मला सांगितलं असतं तर काही माणसं शिवाजी पार्कात पाठवली असती – एकनाथ शिंदे

16. ‘दाऊदचा हस्तक होण्याऐवजी मी मोदींचा हस्तक होणं पसंत करेन’. लोकांच्या हिताचेच तेच आम्ही करू. पोटापाण्यासाठी जे व्यवसाय केले. त्याची खिल्ली उडवताय. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. टपरीवाला मंत्री होऊ शकत नाही का? कटप्पा हा स्वाभिमान होता, तुमच्यासारखा दुटप्पी नव्हता. खोटं बोलून सहानभूती घेऊ शकत नाही.  – एकनाथ शिंदे

17. ‘नवी मुंबई विमानतळाला तुम्हीच बाळासाहेबांचं नाव द्यायला सांगितलं, दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या बैठकीतून तुम्ही निघून गेलात’ – एकनाथ शिंदे

18. ‘तुम्हाला लाज नाही का वाटली मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला?’ आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारस. ‘माझ्या वडिलांनी त्याग केलाय, तुम्ही काय केलं?’ ‘तुम्ही कुणाला साधी चापट तरी लावलीय?’,’आम्ही तुमच्यासाठी केसेस घेतल्यात’,’दीड वर्षाच्या मुलावर टीका करतायत’ लोकांच्या घामातून शिवसेना उभी राहिली. जे मोठे झाले, तुम्ही त्यांचेच पाय कापले. – एकनाथ शिंदे

19. काहींनी मराठा मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवलं. पण आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार म्हणजे देणार. ओबीसी असो वा इतर समाजाच्या तुम्ही पाठिशी राहिला नाहीत – एकनाथ शिंदे

20. विकासाचे मॉडेल आता दोन वर्षांत दिसून येईल,पोलिसांचे गृहकर्ज पुन्हा सुरु केले, असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी योजना आणणार;आरोग्य सुविधा वाढवणार, पोलिसांची 20 हजार पदे आम्ही भरणार आहोत;मुंबई लवकरच खड्डे मुक्त होईल, शहराचे सुशोभिकरण करण्यात येईल;55 लाख लोकांनी 75 वर्षांच्या लोकांना बस प्रवास योजनेचा लाभ मिळाला;राज्यात मोठं-मोठे प्रकल्प आणण्यासाठी केंद्र मदत करणार- एकनाथ शिंदे

आणखी संबंधित बातम्या

Suresh Mapari : नाराजीचा उद्रेक! ठाकरे गटाला विदर्भात मोठा धक्का

2026-05-24 09:37:29

Suresh Mapari : नाराजीचा उद्रेक! ठाकरे गटाला विदर्भात मोठा धक्का

Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांना न्यायालयाचा दणका; प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी अडचणी वाढल्या, आता थेट...

2026-05-24 09:10:14

Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांना न्यायालयाचा दणका; प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी अडचणी वाढल्या, आता थेट...

Bachchu Kadu : बच्चू कडू शिंदेंच्या शिवसेनेत का गेले? 'ते' मोठे कारण आले समोर!

2026-05-23 15:46:46

Bachchu Kadu : बच्चू कडू शिंदेंच्या शिवसेनेत का गेले? 'ते' मोठे कारण आले समोर!

Shiv Sena leader Arrest : राजकीय वर्तुळात खळबळ ! एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याला अटक

2026-05-21 18:09:18

Shiv Sena leader Arrest : राजकीय वर्तुळात खळबळ ! एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याला अटक

MLC Election : महायुतीमध्ये वादाची ठिणगी? शिंदेसेनेच्या 'या' जागेवर भाजपचा दावा

2026-05-21 16:59:16

MLC Election : महायुतीमध्ये वादाची ठिणगी? शिंदेसेनेच्या 'या' जागेवर भाजपचा दावा