Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी सुनावले गायकवाड अन् शिरसाटांना खडेबोल; दिला थेट इशारा, म्हणाले “हे खपवून….”

Eknath Shinde : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या आमदारांच्या कारनाम्याची जोरदार चर्चा आहे. संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेली मारहाण आणि संजय शिरसाट यांचा व्हायरल झालेला व्हिडीओ. या दोन्ही प्रकरणांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. अशातच याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
शिवसेना प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही आमदारांचे कडक शब्दांत खडेबोल सुनावले आहेत. आमदारांच्या बेशिस्त वक्तव्य आणि वागणुकीमुळे पक्षाची प्रतिमा डागाळत आहे. त्यामुळे असा बेशिस्तपणा खपवून घेणार नसल्याची सक्त ताकीद एकनाथ शिंदेंनी दिली आहे.
संजय गायकवाड प्रकरण
आमदार निवासात खराब जेवण मिळत असल्याच्या कारणावरून आमदार संजय गायकवाड यांनी कँन्टीन कर्मचाऱ्याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने अधिवेशनातही गायकवाड यांनी केलेल्या कृत्यामुळे टीकेची झोड उठविण्यात आली.
मंत्री शंभुराज देसाई यांची शिवराळ भाषा
पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात खंडाजंगी होताना पाहायला मिळत आहे. नुकतेच शिंदेसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि उबाठा गटाचे मंत्री अनिल परब यांच्यात खंडाजंगी विधानसभेत झाली. देसाईंनी परबांवर शिवराळ भाषा वापरली होती.
संजय शिरसाट व्हायरल व्हिडीओ
शिंदेंचे मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ माध्यमांत व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये संजय शिरसाट बेडवर बसून सिगारेट ओढत फोनवर बोलत आहेत आणि या बेडखाली पैशांची मोठी बॅग असल्याचं दिसत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर शिरसाट यांनी स्पष्टीकरण देत करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
शिंदेंची कोंडी
या आमदारांच्या कारनाम्यांमुळे एकनाथ शिंदेंची मोठी कोंडी झाली आहे. विरोधकांकडून शिंदे सेनेतील आमदारांवर टीकास्त्र डागली जात आहेत.
हेही वाचा : ‘तुम्ही फ्यूल का बंद केलं?’ एअर इंडिया विमान अपघातातील मोठी माहिती समोर…





