Eknath Shinde : “हा तर फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी आहे!” एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या 'ऑपरेशन कमळ'च्या आव्हानाला अत्यंत आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले.

Eknath Shinde : शिवसेना म्हणजे राजकीय पक्ष नाही, फक्त वादळ आहे. खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले. त्यांच्या हयातीत तुम्ही त्यांना त्रास दिला. ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना वाचवायचे काम केले, त्यांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम केले, त्यांनाच आज तुम्ही शिव्या देत आहात. (Eknath Shinde)
आज महाराष्ट्रात बाळासाहेबांचे विचार, धर्मविरांचे विचार घेऊन आपण पुढे चाललो आहोत. हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. (Eknath Shinde)
गोरेगाव येथे शिवसेनेच्या ६०व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजीत मेळाव्यात ते बोलत होते. राज्यात ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेसेनेचे खासदार फोडण्यात आल्याची चर्चा आहे. याबाबत अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झाले नसले, तरीही हा फुतीर गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर सभेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. (Eknath Shinde)
एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेनेचा जन्म मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी झाला असून, या माध्यमातून महाराष्ट्राच्या अस्मितेची मोठी चळवळ उभी राहिली. मराठीचा निर्धार, देशद्रोह्यांवर प्रहार, लाडक्या बहिणींचा स्वाभिमान, शेतकऱ्यांचा तारणहार आणि वारकऱ्यांचा जयजयकार म्हणजे शिवसेना! (Eknath Shinde)
हा एकनाथ शिंदे लढवय्या आहे, कुणावर संकट आले तर पुढे मी असेन. हे काय आम्हाला चॅलेंज देणार. आता म्हणतात तुडवा. हिंमत असेल तर समोर या. तुडवायला पाय लागतात, तुम्ही आला तर हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? असा इशारा त्यांनी दिला. (Eknath Shinde)
तसेच मी डॉक्टर नसलो तरीही अजूनही ऑपरेशन करतो आणि ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं, लांडग्याचं नाही. लांडग्याचं कातडं पांघरून वाघ होता येत नाही, असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे बोचरी टीका केली. (Eknath Shinde)
मुंबई सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे म्हणून त्यांनी जोर दिला. परंतु लोकांनी महायुतीला पसंती दिली. मुंबईत शंभर टक्के काँक्रिटचे रस्ते होणार आहेत. मेट्रो बंद होती, मेट्रोचे काम सुरू केले. (Eknath Shinde)
समृद्धी महामार्ग सुरू केला. कोस्टल रोड सुरू केला. म्हणूनच जनतेने महायुतीला विजय मिळवून दिला. यांचे दिल्लीतही तेच, गल्लीतही तेच आहे. त्यांची इंडिया आघाडी बुडाली आहे. कितीही शून्य एकत्र आले तरी बेरीज शून्यच येते, असा हल्लाबोल त्यांनी केला. (Eknath Shinde)





