‘त्यांना सावरकर नाही औरंगजेब…’ ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

Eknath Shinde । लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचे मतदान उद्या पार पडणार आहे. त्यातच कालच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक देखील केले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “विरोधकांना सावरकरांचे काम नाही चालत, त्यांना औरंगजेब चालतात, भगवा झेंडा चालत नाही, तर पाकिस्तानचा हिरवा झेंडा चालतो. याकूब मेमनचा माणूस, बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा हा विरोधी रॅलीत दिसत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला. एवढेच नाही तर विरोधकांच्या रॅलीत पाकिस्तानी झेंडे फडकवले जात असल्याचे म्हणत विरोधकांवर निशाणा साधला.
#WATCH | Mumbai | On Opposition, Maharashtra CM Eknath Shinde says, “Savarkar unko nahi chalta hai, Aurangzeb unko chalta hai; Unko bhagwa jhanda nahi chalta hai, unko Pakistan ka hara jhanda chalta hai. Bomb blast accused Iqbal Moosa, men of Yakub Memon are seen in their… pic.twitter.com/4Z3DwrsgSL
— ANI (@ANI) May 18, 2024
विरोधकांना भगव्या झेंड्याची ऍलर्जी Eknath Shinde ।
तसेच “विरोधकांकडून काय अपेक्षा ठेवता येईल? विरोधकांना भगव्या झेंड्याची ऍलर्जी झालीय.” विरोधकांनी संघाच्या झेंड्याचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला. “आरएएस ही देशभक्त संघटना आहे. राष्ट्रावरील संकटाच्या वेळी आरएसएस ही संघटना आघाडीवर असते त्याच बरोबर आरएसएसचे कार्यकर्ते आपत्ती आणि कोविड महामारीच्या वेळी आघाडीवर राहून काम करताना दिसून आल्याचे म्हणत संघावर स्तुतीसुमने उधळली.
आरएसएसला देशभक्तीपर संघटना Eknath Shinde ।
एकनाथ शिंदे म्हणाले की, आरएसएसचे कार्यकर्ते जीव धोक्यात घालून काम करतात. आरएसएसचा भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांचा असल्याचे त्यांनी म्हटले. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील गोंगाट आज थांबला आहे. 20 मे रोजी लोकसभेच्या 13 जागांसाठी मतदान होणार आहे. 13 मतदारसंघांमध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, कल्याण, पालघर, भिवंडी, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि मुंबई दक्षिण यांचा समावेश आहे. राज्यात 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान झाले आहे. उर्वरित 13 जागांसाठी अंतिम आणि पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार आहे.





