महाबळेश्वर, (प्रतिनिधी) – महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांब हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव. आपल्या गावावर व गावातील प्रत्येक माणसांवर त्यांचा मोठा जीव. निवडणूक जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक गावाला आले आणि ग्रामदैवत जननी मातेचे दर्शन घेवून आशीर्वाद घेतले. यावेळी गावातील ज्येष्ठ महिलांनी ना. एकनाथ शिंदे यांचे औक्षण करत एकनाथ पुन्हा गावात येताना मुख्यमंत्री हो ऊन परत ये असा आशीर्वाद दिला. या प्रेमाने ना. एकनाथ शिंदे भारावून गेले होते. मुंबईचा राजकीय सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज निवडणुकीपूर्व गावच्या ग्रामदैवत जननी माता देवीच्या दर्शनाला अचानक आले आणि गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असल्याचे समजतात गावातल्या जेष्ठ महिलांसह लाडक्या बहिणींनी भेट आपला एकनाथ गावात आलाय म्हणून थेट औक्षण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. आमचा एकनाथ पुन्हा मुख्यमंत्री होणार, एकनाथ पुन्हा मुख्यमंत्री होऊन गावाला या असा आशीर्वाद देत गावातल्या ज्येष्ठ महिलांसह लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गावात पोहोचतात औक्षण केले आणि पुन्हा मुख्यमंत्री होऊन गावात या असा आशीर्वाद दिला. अचानकच यावेळी गावातल्या जेष्ठ आजी महिला यांनी एकनाथ पुन्हा मुख्यमंत्री होऊन गावात या असा आशीर्वाद दिला.