Nagar | संगमनेरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज जाहीर सभा

संगमनेर, (प्रतिनिधी) – महायुतीचे उमेदवार अमोल खताळ पाटील यांच्या प्रचारार्थ खासदार श्रीकांत शिंदे व भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि.१८ रोजी हजारो तरुणांची मोटरसायकल रॅली निघणार आहे.दुपारी तीन वाजता नवीन नगर रोड या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेने या प्रचाराची सांगता होणार आहे.
गेली दहा ते पंधरा दिवसापासून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक गावात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आपल्याला निवडून देण्याचे आवाहन केले आहे. खताळ यांच्या प्रचाराच्या सांगतेच्या निमित्ताने खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपचे माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण शहरातून भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता नवीन नगर रोड या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेने या प्रचाराची सांगता होणार आहे.





