Eknath Khadse : “पुढील निवडणुकीत मी असेल किंवा नसेल..”; एकनाथ खडसेंची जनतेला भावनिक साद, पाहा Video

Updated On:

Eknath Khadse | Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्याच दृष्टीने प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवाराचा जोरात प्रचार करत असून विरोधकांवर देखील सडकून टीका करत आहे. दरम्यान, अश्यातच जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रातील जनतेला भावनिक साद घातली आहे.

एकनाथ खडसे यांनी त्यांच्या फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करत ‘पुढची निवडणूक मी पाहील की नाही हे ईश्वरच ठरवेल, पुढच्या निवडणुकीत मी असेल किंवा नसेल’, असं म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे, पाहा…

ते म्हणाले की, ‘यापुढे मी निवडणूक न लढाविण्याचा निर्णय घेतला आहे. मी गेली अनेक वर्ष आपल्या सोबत आहे. अनेक वर्ष आपणही मला सहकार्य केले आहे, मला आशीर्वाद दिले आहेत.

मी ही तुमच्या सुख दुःखात सहभागी झालेलो आहे. कोणतीही जात धर्म न पाळता मी सर्वांना मदत करण्याची भूमिका आता पर्यंत पार पाडली आहे.

तब्येत ठीक नसते, पुढील निवडणूक मी पाहणार की नाही पाहणार हे तो ईश्वरच ठरवेल. पुढील निवडणुकीत कदाचित मी असेल किंवा नसेल. पण या निवडणुकीत मी आपल्याला विनंती करणार आहे.

की आपण सर्वांनी रोहिणीताईंना निवडून द्यावे. आपण जसं मला सहकार्य केलं तसं रोहिणीताईंना करावं आणि रोहिणी ताईंना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे ही विनंती.’ या आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. आज (18 नोव्हेंबर) निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.

आणखी संबंधित बातम्या

Manoj Jarange : "...तर 10 मिनिटात महाराष्ट्र बंद झाला पाहिजे"; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

2026-09-07 14:48:11

Manoj Jarange : "...तर 10 मिनिटात महाराष्ट्र बंद झाला पाहिजे"; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

Operation Tiger: 'ऑपरेशन टायगर’ पुन्हा होणार? ठाकरे गटाचे 14 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा

2026-09-07 09:14:42

Operation Tiger: 'ऑपरेशन टायगर’ पुन्हा होणार? ठाकरे गटाचे 14 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा

Gunratna Sadavarte : "DJ बंद करुन दाखवाच"; गुणरत्न सदावर्तेंचे राज ठाकरेंना ओपन चॅलेंज

2026-09-07 08:29:00

Gunratna Sadavarte : "DJ बंद करुन दाखवाच"; गुणरत्न सदावर्तेंचे राज ठाकरेंना ओपन चॅलेंज

Newasa News : नेवाशात संतापाचा स्फोट! ऋषिकेश शेटे यांच्यावरील हल्ल्याविरोधात हजारो हिंदू रस्त्यावर; प्रशासनाला निर्वाणीचा इशारा

2026-09-06 22:45:01

Newasa News : नेवाशात संतापाचा स्फोट! ऋषिकेश शेटे यांच्यावरील हल्ल्याविरोधात हजारो हिंदू रस्त्यावर; प्रशासनाला निर्वाणीचा इशारा

Gunaratna Sadavarte : बाळासाहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत बरोबरी होऊ शकते का? सदावर्तेंचा थेट इशारा, १५ दिवसांचा दिला अल्टिमेटम

2026-09-06 22:35:31

Gunaratna Sadavarte : बाळासाहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत बरोबरी होऊ शकते का? सदावर्तेंचा थेट इशारा, १५ दिवसांचा दिला अल्टिमेटम