Eknath Khadse । लोकसभा निवडणुकी दरम्यान ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून राजीनामा दिला होता . त्यावेळी यांनी भाजपमध्ये आपण प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र त्यांनी दिलेला राजीनामा अजूनही शरद पवार गटाकडून स्वीकारण्यात आला नाही. तर दुसरीकडे भाजपकडूनही त्यांच्या त्यांच्या प्रवेशावर कोणती भूमिका घेण्यात आली नाहीत. त्यातच आता एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो झळकल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ खडसे यांचा फोटो शरद पवार व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बॅनरवर झळकलाय. त्यामुळे एकनाथ खडसे हे आता राष्ट्रवादी शरद पवार राहणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. आज एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवर शरद पवार, मुलगी रोहिणी खडसे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांचे फोटो झळकले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बोदवड उत्पन्न बाजार समिती शुभेच्छा बॅनरची सध्या जळगावमध्ये चर्चा होत आहे. काय म्हणाल्या रक्षा खडसे ? Eknath Khadse । एकनाथ खडसे नेमके कोणत्या पक्षात आहेत. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला का वेळ लागत आहे, असे मुद्दे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत. याबाबत रक्षा खडसे यांनी, “नाथाभाऊंनी लोकसभेला मला पाठिंबा दिला. माझ्यासाठी काम केले. भाजपामध्ये येण्याची इच्छा ही व्यक्त केली. तो नाथाभाऊंचा व्यक्तिगत विषय आहे. त्यांनाच याबाबत विचारणे अधिक चांगले, अशी प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी दिली आहे. गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना टोला Eknath Khadse । दरम्यान, काही दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांना एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता ते म्हणाले की, भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार का? हे तुम्हीच त्यांना विचारा असं म्हणत त्यांनी विषय टाळला. खडसेंची डायरेक्ट वरती लाईन आहे असा टोला लगावत, त्यांनी राजीनामा दिला आहे का किंवा ते भाजपमध्ये येणार आहेत का? हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा, असं महाजन म्हणाले. सुप्रिया सुळे यांना माहित नाही, जयंत पाटलांना माहित नाही, शरद पवारांनाही माहित नाही. त्यापेक्षा त्यांनाच जाऊन विचारा त्यांचं स्टेटस नक्की काय? असं म्हणत गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला होता. हेही वाचा हिंगोलीत पुरात अडकलेल्या लोकांना आमदार संतोष बांगर यांनी रेस्क्यू पथकासोबत जाऊन बाहेर काढले