Accident News : आयशर टेम्पोची दुचाकीस धडक; दांपत्य जागीच ठार
Updated On:

हिंगोली – सेनगाव शिवारामध्ये भरधावआयशर टेंम्पोने दुचाकीलापाठीमागून धडक दिल्याने झालेल्याअपघातात, पती-पत्नीचा जागीचमृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडे सातवाजण्याच्या सुमारास घडली आहे.
गणेश शंकर मुंडे (40) व सवितागणेश मुंडे (35, रा.सावरखेडा ) अशी मृतांची नावे आहेत. मुंडे दांपत्य सकाळी त्यांच्यादुचाकीने घोटा देवी येथे नवरात्रोत्सवामुळे तुळजादेवीच्या दर्शनासाठी गेले होते.
दर्शन घेऊनदोघेही गावातच सविता यांच्या माहेरी गेले होते. त्या ठिकाणी जेवण आटोपून रात्री दोघे दुचाकी वाहनावर सावरखेडा गावाकडे निघाले होते.
सेनगाव शिवारात आले असताना भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पोनेत्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडकदिली. यामुळे दुचाकीवरील मुंडे दांपत्याचा जागीच मृत्यू झाला.





