Mostafa Ziko Accuses : “मेस्सीला जिंकवण्यासाठी वर्ल्डकप फिक्स…!” ७९ मिनिटांनंतर सामना फिरवताच इजिप्तच्या खेळाडूचा फिफावर गंभीर आरोप; फुटबॉल विश्वात खळबळ
Mostafa Ziko Accuses : सामन्यानंतर संतापलेल्या इजिप्तचा फॉरवर्ड खेळाडू मोस्तफा झिको याने रेफ्री आणि फिफावर थेट मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप केले आहेत

Mostafa Ziko Accuses FIFA Fixed Controversy VAR Lionel Messi Argentina vs Egypt : फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) च्या ‘राऊंड ऑफ १६’ मध्ये फुटबॉल इतिहासातील सर्वात रोमांचक आणि वादग्रस्त सामन्यांपैकी एक लढत पाहायला मिळाली. इजिप्तविरुद्धच्या सामन्यात ७९ व्या मिनिटापर्यंत २ गोलने मागे असलेल्या अर्जेंटिनाने (Argentina) अखेरच्या मिनिटांत चमत्कारिक पुनरागमन करत ३-२ असा थरारक विजय मिळवला.
मात्र, या सामन्यात ‘VAR’ (व्हिडिओ असिस्टंट रेफ्री) च्या वादग्रस्त निर्णयांमुळे फुटबॉल जगतात खळबळ उडाली आहे. सामन्यानंतर संतापलेल्या इजिप्तचा फॉरवर्ड खेळाडू मोस्तफा झिको (Mostafa Ziko) याने रेफ्री आणि फिफावर थेट मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप केले आहेत.
“कप अर्जेंटिनाला देण्यासाठी टूर्नामेंट फिक्स…!” झिकोचा संताप –
Mostafa Ziko’s interview after the match against Messi’s Argentina
🚨🗣️ Mostafa Ziko: “Congratulations to Argentina on the World Cup; the tournament was rigged, they didn’t need anything else.”
“The referee was unfair, unfair, unfair, unfair.” https://t.co/qqk2GXGniW pic.twitter.com/3H91CnTpt7
— Someone’s Son 💎🇬🇭 (@bigfred6ix9) July 7, 2026
सामन्यात इजिप्तने यासर इब्राहिम आणि मोस्तफा झिको यांच्या गोलच्या जोरावर २-० अशी भक्कम आघाडी घेतली होती. ६० व्या मिनिटाला झिकोने आणखी एक गोल करून इजिप्तला ३-० असे पुढे नेले होते, पण ‘VAR’ ने तपासणीअंती हा गोल रद्द (Disallowed) केला. गोलपूर्वी हेसम हसनने अर्जेंटिनाच्या लिसँड्रो मार्टिनेझवर फाऊल केल्याचे व्हिडीओ रिव्ह्यूमध्ये समोर आले. या निर्णयानंतर आणि इजिप्तची पेनल्टीची अपील नाकारल्यामुळे झिकोने रेफ्री फ्रान्सिस लेटक्सियर यांच्यावर आगपाखड केली. प्रसिद्ध पत्रकार फॅब्रिझिओ रोमानोच्या हवाल्यानुसार झिको म्हणाला, “रेफ्रींनी निष्पक्षता दाखवली नाही. हा विश्वचषक थेट अर्जेंटिनाला सोपवण्यासाठी संपूर्ण टूर्नामेंट आधीच ‘फिक्स’ करण्यात आली आहे!”
This video shows clips of fouls on Egypt vs Argentina.pic.twitter.com/AghhQUn88J
— The thinker man (@kwekuedilson) July 8, 2026
मेस्सीचा पेनल्टी मिस; पण रोमेरो-एंझोने घडवला चमत्कार –
WHEN THIS WENT INNNNN pic.twitter.com/qu8TiFJ9IM
— We Are Messi 🔟 (@WeAreMessi) July 7, 2026
३९ वर्षीय लिओनेल मेस्सीसाठी हा त्याचा शेवटचा विश्वचषक मानला जात आहे. सामन्यात मेस्सीने एक महत्त्वाची पेनल्टी देखील गमावली होती, ज्यामुळे गतविजेत्या अर्जेंटिनाचे आव्हान संपणार असे वाटत होते. मात्र, ७९ व्या मिनिटाला डिफेंडर क्रिस्टियन रोमेरोने हेडरद्वारे पहिला गोल करत अर्जेंटिनाची आशा जिवंत केली. त्यानंतर ८३ व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीने वर्ल्ड कपच्या इतिहासातील आपला २१ वा विक्रमी गोल करत स्कोअर २-२ असा बरोबरीत आणला.
अखेर, इंजरी टाईममध्ये एंझो फर्नांडिजने निर्णायक गोल डागत अर्जेंटिनाला क्वार्टर फायनलचे तिकीट मिळवून दिले. या विजयामुळे १९५८ आणि १९६२ मधील ब्राझीलच्या विक्रमानंतर सलग दुसरा विश्वचषक जिंकण्याच्या अर्जेंटिनाच्या आशा कायम आहेत.





