कॉन्सर्टआधी चेन्नईच्या रस्त्यावर हेड मसाज करताना दिसला प्रसिद्ध गायक एड शीरन, मजेशीर व्हीडिओ व्हायरल

Ed Sheeran: ब्रिटीश पॉप स्टार एड शीरनचे जगभरात चाहते आहेत. भारतातही त्याची गाणी आवडीने पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. सध्या एड शीरन भारत दौऱ्यावर आहे. त्याच्या +–=÷× कॉन्सर्टच्या ( मॅथमेटिक्स टूर) निमित्ताने तो भारतातील अनेक शहरांचा दौरा करत आहे. पुणे, हैदराबादनंतर आज (5 फेब्रुवारी) चेन्नईमध्ये त्याच्या पुढील कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. कॉन्सर्टआधीच त्याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हीडिओमध्ये एड शीरन चेन्नईतील रस्त्यावर हेड मसाज करताना दिसत आहे. देसी स्टाइलमध्ये हेड मसाज करतानाचा हा व्हीडिओ त्याच्याच टीमने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये तो देसी हेड मसाजचा आनंद घेताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एड शीरन चेन्नईतील एका स्थानिक व्यक्तीकडून हेड मसाज करून घेत आहे. मसाज दरम्यान शीरन अतिशय आनंदी आणि तणावमुक्त दिसत आहेत. तसेच, त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणालाही हसू येईल.
View this post on Instagram
हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चाहत्यांनी देखील यावर अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले की, ‘जर कॉन्सर्टवेळी शीरन गाणी विसरला, तर याचे कारण आम्हाला माहिती आहे.’ तर एकाने लिहिले की, ‘या मसाजनंतर आता शीरन हिंदी गाणी देखील गाऊ लागेल.’
दरम्यान, एड शीरन सध्या त्याच्या मॅथेमॅटिक्स टूरच्या निमित्ताने भारतात आहे. त्याच्या कॉन्सर्टची सुरुवात 30 जानेवारीला पुण्यातून झाली. त्यानंतर हैदराबादमध्ये देखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आता चेन्नई, बंगळुरू, शिलाँग आणि दिल्लीत देखील त्याचे कार्यक्रम होणार आहेत.



