‘जेट एअरवेज’ चे संस्थापक गोयल यांच्या घरावर ईडी चे छापे

नवी दिल्ली: परकीय चलन विनिमय कायद्याच्या उल्लंघन प्रकरणा संदर्भात जेट एअरवेज कंपनीचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर ईडी ने छापे मारले आहेत. परकीय चलन विनिमय अधिनियमातील (फेमा)तरतुदींच्या आधारे अतिरिक्त पुरावे गोळा करण्यासाठी गोयल यांच्या मुंबई आणि दिल्ली मधील घरावर हे छापे मारण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.

जेट एअरवेज ही कंपनी सध्या दिवाळखोरीतून जात असल्याने कंपनी बंद पडली आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अहवालात सदरील कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार असल्याचे समोर आले आहे. गोयल हे मार्च मध्ये कंपनीच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.