ED ची मोठी कारवाई: चीनी स्मार्टफोन निर्माता “शाओमी’च्या बॅंक खात्यातील 5551 कोटी रुपये जप्त
Updated On:

नवी दिल्ली – अंमलबजावणी संचालनालयाने स्मार्टफोन निर्माता चीनी कंपनी शाओमी वर शनिवारी मोठी कारवाई केली. ईडीने शाओमी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या बँक खात्यांमध्ये जमा असलेले 5551.27 कोटी रुपये जप्त केले आहेत. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने केलेल्या फसवणुकीप्रकरणी ईडीने विदेशी मुद्रा व्यवस्थापन कायदा, 1999 अंतर्गत ही कारवाई केली आहे.





