ईडीने नवी मुंबईत जप्त केली 52 कोटींची मालमत्ता
Updated On:

मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने मोनार्क युनिव्हर्सल ग्रुपच्या प्रकरणात नव्या मुंबईतील ५२.७३ कोटी रूपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली आहे. मेसर्स मोनार्क युनिव्हर्सल ग्रुप, गोपाल अमरलाल ठाकूर, हसमुख अमरलाल ठाकूर आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली महाराष्ट्र पोलिसांनी नोंदवलेल्या अनेक एफआयआरच्या आधारे ईडीने ही कारवाई केली.
या कंपनीने फ्लॅट खरेदीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पैसे गोळा करणे, अर्थ संस्थांची फसवणूक करणे, एकाच फ्लॅटची अनेक खरेदीदारांना विक्री करणे असे गैरव्यवहार केले आहेत. त्यानुसार अनेक पोलिस तक्रारीही संबंधीत कंपनीच्या विरोधात दाखल आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून हे गैरव्यवहार चालू होते.





