Ecole T20 Cup 2024 : – रवींद्र जाधवच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर राजस्थान रॉयल्स अकादमी संघाने मेव्हिरिक्स अकादमी संघाला ४ गडी राखून पराभूत करताना, इकोल स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या इकोल टी-२० करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
शिंदे हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या लढतीमध्ये, मेव्हिरिक्स अकादमी संघाने निर्धारित २० षटकांत ९ बाद १६५ धावांपर्यंत मजल मारली. यशराज खाडेने नाबाद ४८ (४ चौकार, २ षटकार) धावांची खेळी करताना संघाला दीडशे धावांची टप्पा पार करून दिला. महेश म्हस्केने २८ (२ चौकार, १ षटकार), शुभम तैस्वालने ३२ (४ चौकार, १ षटकार), तर रणजीत निकमने २२ (२ चौकार, १ षटकार) धावांचे योगदान दिले. रवींद्र जाधवने ३, ओंकार राजपूतने २ तर केदार बजाज व निलय नेवासकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
राजस्थान रॉयल्स अकादमी संघाने १९.२ षटकांत ६ बाद १६७ धावा करताना विजय साकारला. रवींद्र जाधवने ३३ (१७ चेंडू, १ चौकार, ३ षटकार), वेदांत पाटीलने ३१ (१ चौकार, ३ षटकार), ओंकार राजपूतने २५ (३ चौकार), स्नेहल खमणकरने ३० (२ चौकार, ३ षटकार), मेहुल पटेलने २५ (४ चौकार, १ षटकार) धावांची खेळी करताना संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. संज्योत सुतारने ३, ओंकार गुंजाळने २ तर हरी सावंतने १ गडी बाद केला.