Women’s Cricket : महिला क्रिकेटपटूंसाठी ECB चा मोठा अन् ऐतिहासिक निर्णय…

England Womens Cricket Team Match Fee : इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. वास्तविक, आता इंग्लंडच्या महिला संघाला इंग्लंड पुरुष संघाप्रमाणेच सामना फी मिळेल. यापूर्वी, इंग्लंडच्या महिला संघाला इंग्लंडच्या पुरुष संघापेक्षा कमी सामना फी मिळत होती, परंतु आता दोन्ही संघांना समान पैसे(Match fee) मिळतील.
महिला अॅशेस मालिकेसाठी मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी हजेरी लावल्याने इंग्लंडमधील महिला क्रिकेटपटूंसाठी मॅच फी पुरुषांप्रमाणेच करण्यात आली आहे.इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेपासून इंग्लंड महिला संघास समान मॅच फी लागू होईल.नुकत्याच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या एकदिवसीय सामन्यांनादेेेेखील सुमारे 20,000 प्रेक्षकांची नोंद झाली होती.
इंग्लंडमधील एका स्वतंत्र आयोगाने क्रिकेटमधील समानतेच्या अहवालात पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी सामना शुल्क समान करण्याची शिफारस केली होती. महिला क्रिकेटपटूंना पुरुषांच्या तुलनेत वनडेमध्ये केवळ 20.6 टक्के मॅच फी मिळते, असे या अहवालात म्हटले होते.त्यानंतर ECB ने हा निर्णय घेतला आहे.
अलीकडेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने देखील पुरुष आणि महिला विश्वचषक स्पर्धेची बक्षीस रक्कम समान करण्याची घोषणा केली होती.दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड मध्ये आधीच महिला संघांना समान मॅच फी लागू करण्यात आली आहे.





