MLC Election : तीन राज्यांमध्ये विधान परिषदेच्या 15 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

नवी दिल्ली : आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि बिहारमध्ये विधान परिषदेच्या 15 जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या या जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, आंध्र प्रदेश, तेलंगणातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 23 मार्चला तर बिहारमधील पाच जागांसाठी 31 मार्चला मतदान होणार आहे. आंध्र-तेलंगानामध्ये निकाल 23 मार्चला तर बिहारचा निकाल 5 एप्रिल रोजी लागणार आहे. वास्तविक या जागांसाठी निवडून आलेल्या विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ मार्च आणि मे महिन्यात संपत आहे.
आंध्र प्रदेश –
आंध्रप्रदेश मधील चल्ला भागीरथ रेड्डी (02.11.2022 पासून रिक्त), नारा लोकेश, पोथुला सुनीता, बचुला अर्जुनुडु, डोक्का माणिक्य वरप्रसाद राव, वराह वेंकट सूर्यनारायण राजू पेनुमत्सा, गंगुला प्रभाकर रेड्डी यांचा कार्यकाळ 29 मार्च रोजी पूर्ण होत आहे.
तेलंगणा –
तेलंगणा मध्ये एलिमिनेटी कृष्णा रेड्डी, गंगाधर गौड़ वुल्लोला, नवीन कुमार कुरमैयागरी यांचा कार्यकाळ 29 मार्च रोजी संपत आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/chief-minister-eknath-shinde-will-meet-the-prime-minister-regarding-the-status-of-classical-language-to-marathi/
बिहार –
सारण पदवीधर मतदारसंघातून वीरेंद्र नारायण यादव, गया पदवीधर मतदारसंघातून अवधेश नारायण सिंह, गया शिक्षक मतदारसंघातून संजीव श्याम सिंह आणि कोशी शिक्षक मतदारसंघातून संजीव कुमार सिंह यांचा कार्यकाळ 8 मे 2023 रोजी संपत आहे. याशिवाय सारण शिक्षक मतदारसंघातील केदारनाथ पांडे यांच्या निधनामुळे ही जागा 24 ऑक्टोबरपासून रिक्त आहे. त्यांचा कार्यकाळ 16 नोव्हेंबर 2026 पर्यंत होता.





