पुणे जिल्हा | खा. सुळेंना भोरमधून भरभरून मतदान

भोर, (वार्ताहर) – बारामती लोकसभा मतदारसंघात खा. सुप्रिया सुळे यांना बारामतीमधून ४८ हजार १६८ मतांचे मताधिक्य मिळाले. तर भोरमधून ४२ हजार ९०५ मतांची आघाडी मिळाली. बारामती मतदारसंघानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य खा. सुळे यांना भोर विधानसभा मतदारसंघातून मिळाले आहे. मागील निवडणुकीचा विचार केला तर या वेळी खा. सुळे यांना दुपटीने मताधिक्य मिळाले आहे.
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे ९० हजार ९१५ तर महादेव जानकर यांना ७४ हजार ३० एवढे मते मिळाली. सुळे यांना १६ हजार ८८५ एवढ्या मतांची आघाडी मिळाली. तर, सन २०१९ च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना भोरमधून १९६०४ मतांची आघाडी मिळाली.
तर २०२४ लोकसभा निवडणुकीच्या निकालात भोर मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना यांना १ लाख ३४ हजार २४५ तर, सुनेत्रा पवार यांना ९० हजार ४४० मते मिळाली. २०१९ मध्ये खा. सुप्रिया सुळे यांना १९ हजार ६०४ मतांचे मताधिक्य मिळाले होते. या वेळी सुप्रिया सुळे यांना भोरमधून २४ हजार ३०१ मतदान झाले.बारामती लोकसभा मतदारसंघात खा. सुप्रिया सुळे यांना बारामतीमधून ४८ हजार १६८ मतांचे मताधिक्य मिळाले. तर भोरमधून ४२ हजार ९०५ मतांची आघाडी
गेल्या वेळी (२०१९) सुप्रिया सुळे यांना भोर शहरातून विरोधी उमेदवारापेक्षा १ हजार ९०० मते कमी मिळाली होती. परंतु या वेळी शहरातून सुप्रिया सुळे यांना सुमारे १ हजार ३५० मतांचे मताधिक्य मिळाले आहे.





