दिल्ली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली; लोकांमध्ये घबराट; पंतप्रधान मोदींनी केले आवाहन…

Earthquake in Delhi | दिल्ली-एनसीआरमध्ये सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ही रिश्टर स्केलवर ४.० मोजली गेली असून त्याचे केंद्र दिल्लीच्या आसपास जमिनीपासून ५ किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगितलं जात आहे. पहाटे ५.३६ वाजता हा भूकंप झाल्याची माहिती आहे, यामुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
काही सेकंदांपर्यंत भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की लोक खबरदारी म्हणून ते तात्काळ घराबाहेर पडले. या भुंकपाच्या धक्क्यामुळे काही सेकंद घरे, इमारती थरथरू लागल्या होत्या. सुदैवाची बाब म्हणजे सध्या जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त समोर आलेले नाही.
EQ of M: 4.0, On: 17/02/2025 05:36:55 IST, Lat: 28.59 N, Long: 77.16 E, Depth: 5 Km, Location: New Delhi, Delhi.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0 @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia pic.twitter.com/yG6inf3UnK— National Center for Seismology (@NCS_Earthquake) February 17, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्वीट
दिल्लीतील भूकंपाच्या धक्क्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, दिल्ली आणि आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. सर्वांनी शांत राहण्याचे आणि सुरक्षिततेच्या खबरदारीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. अधिकारी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. या भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवीतहानी अथवा कोणत्याही मालमत्ताचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेले नाही.
Tremors were felt in Delhi and nearby areas. Urging everyone to stay calm and follow safety precautions, staying alert for possible aftershocks. Authorities are keeping a close watch on the situation.
— Narendra Modi (@narendramodi) February 17, 2025
दिल्ली-एनसीआर भूकंपाच्या झोन IV मध्ये येते. हे असे क्षेत्र आहे जिथे सतत भूकंप होत असतात. येथे वेळोवेळी भूकंपाचे धक्के जाणवतात. मात्र या तीव्रतेचे धक्के बऱ्याच दिवसांनी जाणवले आहेत.
हेही वाचा:





