Video : म्यानमार-थायलंडमध्ये भूकंप, पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली गगनचुंबी इमारत; 43 लोकं अडकले

Powerful earthquakes hit Myanmar | म्यानमारमध्ये आज भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. हा भूकंप एवढा शक्तिशाली होता की थायलंडची राजधानी बँकॉकपर्यंत याचे धक्के जाणवले. या भूकंपाच्या धक्क्यामुळे बँकॉकमध्ये काही इमारती कोसळल्या आहेत. तसेच, म्यानमारच्या राजधानी नेपिडोच्या रस्त्यांवरही भेगा पडल्याचे फोटो समोर आले आहेत.
भूकंपाच्या धक्क्यामुळे बँकॉकमधील बांधकाम सुरू असलेली गगनचुंबी इमारत कोसळली . इमारत कोसळळ्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 43 लोकं अडकली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या सोशल मीडियावर इमारत कोसळत असतानाचे व्हीडिओ व्हायरल होत आहेत. या व्हीडिओमध्ये बांधकाम सुरू असलेली बहुमजली इमारत अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत असल्याचे दिसत आहे. इमारत कोसळत असताना लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावत असल्याचे दिसून येत आहे.
Additional footage showing the collapse of an under construction skyscraper in Bangkok, during today’s 7.7 magnitude earthquake on the border between Thailand and Myanmar. pic.twitter.com/NX3o5XbJtA
— OSINTdefender (@sentdefender) March 28, 2025
दरम्यान, म्यानमारमध्ये आज सकाळी 7.2 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने (एनसीएस) याबाबतची माहिती दिली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंपाचे केंद्र मध्य म्यानमारमध्ये जमिनीपासून 10 किलोमीटर खाली होते. भूकंपाचे केंद्रबिंदू मध्य म्यानमारमध्ये होते, जे मोनीवा शहरापासून सुमारे 50 किलोमीटर पूर्वेस होते.
म्यानमारमधील विनाशकारी भूकंपाने केवळ स्थानिक क्षेत्रच नव्हे तर ग्रेटर बँकॉक प्रदेशालाही हादरवून टाकले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे बँकॉकमधील उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना इमारती खाली कराव्या लागल्या. बँकॉकच्या दाट लोकवस्ती असलेल्या भागात भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घाबरून उंच इमारती आणि हॉटेलमधून बाहेर पडले.





