Earthquake in Philippines: कोसळलेल्या इमारती अन् शाळांपासून मॉल्सपर्यंत ऐकू येणाऱ्या किंकाळ्या … ; फिलीपिन्समध्ये भूकंपाचा विध्वंस
Earthquake in Philippines: फिलीपिन्समध्ये आज सकाळी ७.८ तीव्रतेचा भूकंप झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

Earthquake in Philippines: फिलीपिन्समध्ये आज सकाळी ७.८ तीव्रतेचा भूकंप झाला असल्याची माहिती समोर येत आहे. एका तासाच्या आत याठिकाणी तीन वेळा शक्तिशाली भूकंप झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. या शक्तिशाली भूकंपाने लोकांना हादरवून सोडले.
भूकंपामुळे झालेल्या विनाशकारी विध्वंसाचे व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात इमारतींचा ढिगारा झाल्याचे, कार्यालये आणि शाळांची भीषण अवस्था दिसत आहे. काही भागांमध्ये घरांच्या भिंती हादरल्या असून अनेकांचे संसार उघड्यावर आल्याचे वृत्त आहे. (Earthquake in Philippines)
फिलीपिन्स इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मॉलॉजी अँड व्होल्कॅनॉलॉजीने लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. संस्थेने म्हटले आहे की, भूकंपाचे आफ्टरशॉक्स (पुनर्धक्के) येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
🚨Ireneo National Highway School in General Santos City, Philippines as M7.8 earthquake strikes.
🎥: RMN GENSAN pic.twitter.com/SSnggg5pWz— Random Hero (@RandomHeroWX) June 8, 2026
नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचा आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बाधित भागांमध्ये पथके पाठवली जात आहेत.
भूकंपामुळे घाबरलेली शाळकरी मुले (Earthquake in Philippines)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, भूकंपानंतर घाबरलेली शाळकरी मुले एकमेकांचे हात धरून जमिनीवर बसलेली दिसत आहेत. हा व्हिडिओ फिलीपिन्सच्या जनरल सँटोस येथील इरेनियो नॅशनल हायवे स्कूलमधील असल्याचे म्हटले जात आहे.






