भूकंपाच्या धक्क्यांनी पालघर पुन्हा हादरल..
Updated On:

पालघर – पालघर जिल्ह्यात भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरूच आहे. गेल्या दीड वर्षांपासून भूकंपाचे सुरू असलेले हे चित्र अद्यापही कायम आहे. आज पहाटे पुन्हा एकदा पालघर जिल्ह्याला भूकंपाचे धक्के बसले. पालघरमधील डहाणू, कासा, तलासरीतील परिसर भूकंपाचे धक्क्याने हादरले. जिल्ह्यात सौम्य स्वरूपाचे भूकंपाचे धक्के बसले असले तरी ऐन दिवाळीत नागरिकांमध्ये भितीच वातावरण पसरले आहे.
दरम्यान, शुक्रवारी रात्री आणि आज पहाटे पालघर जिल्ह्यात सौम्य स्वरूपाचे भूकंपाचे पाच धक्के जाणवले. शनिवरी पहाटे जिल्ह्यात दोन भूकंपाचे धक्के जाणवल्याची नोंद गुजरात सिसमोलोस्टिक रिसर्च सेंटरकडून करण्यात आली आहे. शनिवारी पहाटे ४ वाजून ६ मिनिटांनी कासा, चारोटी, पेठ, शिसने, आंबोली या ठिकाणी भूकंपाचा पहिला धक्का जाणवला.





