Earthquake: पापुआ न्यू गिनीमध्ये 7.3 आणि तिबेटमधील भूकंपाचे धक्के; 4.2 रिश्टर स्केल एवढी तीव्रता

शिझांग : पापुआ न्यू गिनी आणि तिबेट भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले आहे. तिबेटमधील शिझांग शहरात मध्यरात्री रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, शिजांगमध्ये भूकंपानंतर लोकांमध्ये भीती पसरली आणि लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती समोर आलेली नाही.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रविवारी रात्री 11.34 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. प्रशासनाकडून त्सुनामीचा इशारा अद्याप देण्यात आलेला नाही. सध्या घटनास्थळी झालेल्या नुकसानीसंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
पापुआ न्यू गिनी आणि तिबेटपर्वी रविवारी सकाळी 11 वाजता मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 इतकी नोंदवण्यात आली होती.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, पचमढीपासून 218 किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.





