E-Aadhaar Authentication । भारतीय रेल्वेने मोठी तयारी केली आहे आणि एक नवीन प्रणाली लागू करणार आहे, ज्यामुळे तत्काळ तिकीट बुकिंग करणाऱ्या वापरकर्त्यांना कन्फर्म तिकिटे मिळण्यास मदत होणार आहे. तत्काळ रेल्वे तिकिटे बुक करण्यासाठी लवकरच अनिवार्य ई-आधार प्रमाणीकरण सुरू केले जाणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती शेअर केली आहे. रेल्वेमंत्र्यांनी माहिती पोस्ट केली E-Aadhaar Authentication । केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये, भारतीय रेल्वे लवकरच तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी ई-आधार प्रमाणीकरणाचा वापर सुरू करेल” असे म्हटले आहे. त्यांच्या पोस्टमध्ये त्याचे फायदे स्पष्ट करताना त्यांनी लिहिले की, या प्रणालीद्वारे, रेल्वेच्या खऱ्या वापरकर्त्यांना गरजेच्या वेळी कन्फर्म तिकिटे मिळवण्यात मदत होणार आहे. या महिन्याच्या अखेरीस ही प्रणाली सुरू होण्याची अपेक्षा आहे. फक्त १०% वापरकर्ते आधार पडताळलेले आहेत! आयआरसीटीसीची वेबसाइट पाहिली तर, सध्या तिचे १३ कोटींहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत, परंतु यापैकी फक्त १०% वापरकर्ते आधार पडताळलेले आहेत. त्यामुळे भारतीय रेल्वे नियम अधिक कडक करणार आहे जेणेकरून तात्काळ तिकीट बुकिंग प्रक्रिया मजबूत करता येईल आणि फक्त आधार पडताळणी केलेल्या आयआरसीटीसी खात्यांनाच ऑनलाइन तात्काळ तिकीट बुकिंग करण्याची परवानगी दिली जाईल. ही प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर, तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरण अनिवार्य असेल असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. ३.५ कोटी बनावट ओळखपत्रे ब्लॉक केली E-Aadhaar Authentication । समोर आलेल्या माहितीनुसार, तत्काळ तिकीट बुकिंग दरम्यान होणाऱ्या अनियमिततेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधार पडताळणीनंतर काउंटर-आधारित तत्काळ तिकिटे देखील बुक केली जाऊ शकतात. दरम्यान, आयआरसीटीसीने गेल्या एका वर्षात ३.५ कोटी बनावट वापरकर्ता आयडी ब्लॉक केले आहेत, ज्यामुळे त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील सिस्टम गर्दी बरीच कमी झाली आहे. रेल्वे तिकीट बुकिंग प्रणालीमध्ये निष्पक्षता आणण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून, आयआरसीटीसीने एआय-आधारित प्रगत तंत्रांचा वापर करून अनधिकृत तिकिटे रोखण्यासाठी उपाय शोधले आहेत. यासाठी त्यांनी डिस्पोजेबल (अल्पकालीन) ईमेल पत्त्यांसह तयार केलेले असे वापरकर्ता आयडी शोधून निष्क्रिय केले आहेत आणि सर्व प्रवाशांना समान प्रवेश सुनिश्चित केला आहे, असे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या कारवाईनंतर मोठा परिणाम आयआरसीटीसीच्या मते, या कारवाईचे सकारात्मक परिणाम आधीच दिसून आले आहेत, आमच्या प्लॅटफॉर्मवर तयार होणाऱ्या नवीन वापरकर्ता आयडींची संख्या दररोज ६० हजारांवरून ६५ हजारांवरून फक्त १०,००० ते १२,००० वर आली आहे, ज्यामुळे सिस्टमवरील भार कमी झाला आहे आणि तिकीट आरक्षण सुव्यवस्थित झाले आहे. आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी यावर भर दिला की या निर्णयामुळे प्रत्येक प्रवाशाला समान संधी मिळते आणि त्यामुळे अनधिकृत एजंटना सिस्टमचा गैरफायदा घेण्यापासून रोखले जाते.