पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात जिल्ह्यातील कामे रखडली: मुख्यमंत्री

 कराड: पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना सातारा जिल्ह्यातील अनेक कामे रखडली होती. त्यांना सिंचन प्रकल्प पूर्ण करता आले नाहीत. पृथ्वीराज चव्हाण तुम्ही मुख्यमंत्री होतात त्यावेळी जेवढी कामे झाली नाहीत. त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक कामे अतुल भोसले यांनी आणली आहेत. ही कामे जनतेसमोर घेऊन जावा, तुमचा विजय निश्चित आहे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ना. डॉक्टर अतुल भोसले यांना दिला.

कराड येथे रात्री उशिरा रविवारी महाजनादेश यात्रेनिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ना. चंद्रकांत पाटील, ना. गिरीश महाजन, उदयनराजे भोसले, डॉ. अतुल भोसले, पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शेखर चरेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.