#IPL2022 | अन् सामन्यादरम्यान ‘रिकी पॉटिंग’ पंचावर भडकला
Updated On:

मुंबई – कोलकाता आणि दिल्ली यांच्यात रविवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पॉंटिंग याने मैदानावरील पंचांनी दिलेल्या काही निर्णयांवर तिसरे पंच सय्यद खलिद यांच्याशी सामना सुरू असताना वाद घातला. त्याच्या या कृतीवर सध्या सामनाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अजिंक्य रहाणेबाबत दोनवेळा मैदानावर पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचे डीआरएसमुळे स्पष्ट झाले. त्यानंतरही पंचांच्या काही निर्णयांवर त्याने डगआऊटमध्ये हातवारे करत नाराजी दर्शवली होती. अखेर त्याचा संयम सुटला व त्याने थेट सय्यद यांच्याशी हुज्जत घातली. आता सामनाधिकारी काय निर्णय घेतात यावर त्याच्यावर काही कारवाई होणार का, ते जाहीर केले जाईल.





