कोल्हापूर, – लॉकडाऊनच्या काळात राज्यातील अन्य संघ दूध नाकारत होते. काही संघ प्रतिलिटर 15 ते 16 रुपये दर देत होते. या काळात दूध उत्पादक हतबल झाला होता. पण गोकुळने जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याचे दूध नाकारले नाही. दूध उत्पादकाला वाऱ्यावर सोडले नाही. उलट दुधाला प्रतिलिटर 27 रुपये दर दिला. गोकुळची दूध उत्पादकाप्रती असलेली प्रामाणिक भावना लक्षात घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सत्ताधारी शाहू आघाडीला पाठिंबा दिल्याचे माजी खासदार राजू शेट्टी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच गोकुळ कोणत्याही परिस्थितीत मल्टिस्टेट करणार नाही हे नेत्यांनी स्पष्ट केले असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी खासदार शेट्टी यांनी आमदार पी.एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार संजय घाटगे, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांच्या उपस्थितीत सत्ताधारी आघाडीला पाठिंबा दिला.