Driving License Rules : आता RTO मध्ये जाण्याची गरज नाही; घरबसल्या मिळवा डुप्लिकेट DL, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Driving License Rules : ड्रायव्हिंग लायसन्स हरवल्यास किंवा खराब झाल्यास सारथी परिवहन पोर्टलवरून घरबसल्या डुप्लिकेट DL साठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे.

Driving License Rules : ड्रायव्हिंग लायसन्स हरवले, खराब झाले किंवा त्यावरील फोटो अथवा वैयक्तिक माहितीमध्ये बदल करायचा असेल, तर आता अनेक सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत. परिवहन विभागाच्या सारथी परिवहन पोर्टलच्या माध्यमातून घरबसल्या डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करता येतो. त्यामुळे प्रत्येक कामासाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज भासत नाही.
कोणत्या कारणांसाठी डुप्लिकेट DL मिळू शकतो?
मूळ ड्रायव्हिंग लायसन्स हरवले असल्यास डुप्लिकेट लायसन्ससाठी अर्ज करता येतो. याशिवाय लायसन्स खराब झाले असेल, त्यावरील फोटो खराब झाला असेल किंवा वैयक्तिक तपशील अपडेट करायचा असेल, तरी संबंधित ऑनलाइन प्रक्रियेचा वापर करता येतो.
कोणती कागदपत्रे लागतील?
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे गरजेचे आहे.
*मूळ ड्रायव्हिंग लायसन्स (उपलब्ध असल्यास)
*आधार कार्ड, पॅन कार्ड यांसारखे ओळखपत्र
*पत्त्याचा पुरावा म्हणून युटिलिटी बिल किंवा मतदार ओळखपत्र
*पासपोर्ट साइज फोटो
घरबसल्या डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज कसा कराल?
सर्वप्रथम सारथी परिवहन पोर्टलवर जा. त्यानंतर आपले राज्य निवडा. Driving Licence Related Services हा पर्याय निवडा. ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक आणि जन्मतारीख यासह मागितलेली माहिती भरा. त्यानंतर Duplicate Driving Licence या सेवेवर क्लिक करा. आवश्यक माहिती भरा आणि मागितलेली कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा. अर्जाची निर्धारित फी ऑनलाइन भरा. अर्ज सबमिट केल्यानंतर पोर्टलवर दिलेल्या सूचनांचे पालन करा. अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले जाईल. लायसन्स अर्जात दिलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवले जाऊ शकते.
अशा प्रकारे ड्रायव्हिंग लायसन्स हरवले किंवा खराब झाले असल्यास घरबसल्या डुप्लिकेट DL साठी अर्ज करता येतो. याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्समधील काही माहिती अपडेट करण्यासह परिवहन विभागाच्या अनेक सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत.





