Duleep Trophy 2024 : 19 वर्षीय मुशीर खानने रचला इतिहास, पदार्पणातच मोडला सचिन तेंडुलकरचा 33 वर्ष जुना महाविक्रम…

Duleep Trophy 2024 (IND A vs IND B,Musheer Khan) : दुलीप करंडक स्पर्धेला 5 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून यामध्ये 4 संघ सहभागी होत आहेत. दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारत-अ आणि भारत-ब यांच्यात सामना खेळला जात आहे, ज्यामध्ये पहिल्या दिवशी सलामीवीर यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, सरफराज खान आणि वॉशिंग्टन सुंदर यासारखे भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज फेल ठरले . त्यामुळे 19 वर्षीय फलंदाजाने धावा काढण्याचे काम हाती घेतले आणि एका बाजूला खंबीरपणे खेळपट्टीवर पाय रोवून पहिल्याच दिवशी शानदार शतक झळकावण्याचा पराक्रम केला. हा फलंदाज दुसरा कोणी नसून सर्फराज खानचा धाकटा भाऊ मुशीर खान आहे, ज्याने दुलीप ट्रॉफीमध्ये पदार्पण करताना शतक झळकावून मोठा पराक्रम केला.
दुलीप ट्रॉफी पदार्पणातच रचला विक्रम
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुशीर खान 227 चेंडूत नाबाद 105 धावा करून माघारी परतला होता आणि त्याच्या संघाची धावसंख्या 7 गड्यांच्या मोबदल्यात 202 धावा इतकी होती. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला मुशीरने पुन्हा एकदा जबाबदारी स्वीकारली आणि नवदीप सैनीच्या साथीने 8व्या विकेटसाठी 204 धावांची अप्रतिम भागीदारी केली. दरम्यान, मुशीरनेही आपली धावसंख्या 150 च्या पुढे नेली. सरफराजचा धाकटा भाऊ पदार्पणाच्या सामन्यात द्विशतक झळकावण्याच्या मार्गावर होता तेव्हा कुलदीप यादवने त्याला बाद केले. अशा प्रकारे मुशीरची ही ऐतिहासिक खेळी संपुष्टात आली.
सचिन तेंडुलकरचा विक्रम काढला मोडित…
दुलीप ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात मुशीरला द्विशतक झळकावता आले नसले तरी त्याने 181 धावांच्या खेळीने सचिन तेंडुलकरचा 33 वर्षांचा विक्रम मोडला. मुशीरने 373 चेंडूंचा सामना केला आणि त्याच्या डावात 16 चौकार आणि 5 षटकार लगावले आणि दुलीप करंडक पदार्पणाच्या सामन्यात किशोरवयीन (20 वर्षाखालील) तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता, ज्याने जानेवारी 1991 मध्ये गुवाहाटीत दुलीप ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात वेस्ट झोनकडून खेळताना ईस्ट झोनविरुद्ध 159 धावांची इनिंग खेळली होती. आता मुशीरने सचिन तेंडुलकरला चौथ्या क्रमांकावर ढकलले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुशीर खानची दीडशेहून अधिक धावांची ही दुसरी खेळी आहे.
A 6⃣ that hits the roof & then caught in the deep!
Kuldeep Yadav bounces back hard and a magnificent innings of 181(373) ends for Musheer Khan 👏#DuleepTrophy | @IDFCFIRSTBank
Follow the match ▶️ https://t.co/eQyu38Erb1 pic.twitter.com/OSJ2b6kmkk
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 6, 2024
दुलीप ट्रॉफी पदार्पणाच्या सामन्यात किशोरवयीन (20 वर्षाखालील) म्हणून सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रम बाबा अपराजितच्या नावावर आहे. बाबाने 212 धावा केल्या होत्या. यानंतर यश धुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. पदार्पणाच्या सामन्यात त्याने 193 धावांची खेळी केली होती. या दोन खेळाडूंनंतर सरफराजने आता या विशेष यादीत तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान पक्के केले आहे.
Paris Paralympics 2024 : प्रवीण कुमारची ‘सुवर्ण उडी’, High Jump T64 स्पर्धेत भारताला गोल्ड मेडल…
भारत ‘ब’ मजबूत स्थितीत…
मुशीर खानने केलेल्या 181 खेळीच्या जोरावर भारत ‘ब’ने पहिल्या डावात 321 धावा केल्या आहेत. मुशीर खाननला नवदीप सैनीचीही चांगली साथ मिळाली. सैनीने अर्धशतक केलं. मुशीर खानने आतापर्यंत 7 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात तीन शतकं आणि एक अर्धशतक केलं आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 203 आहे.





