Duleep Trophy 2024 : भारत-अ संघाकडे 222 धावांची आघाडी, देवदत्त पडिकलची एकाकी झुंज….

Duleep Trophy 2024 : – भारत-अ व भारत-ड यांच्या लढतीतील दुसरा दिवस गोलंदाजांनी गाजविला. एकाच दिवसात गोलंदाजांनी तब्बल 13 फलंदाज बाद केले. दिवसअखेर भारत अ संघाकडे 222 धावांची महत्वपूर्ण आघाडी आहे.
कालच्या 288 धावांमध्ये केवळ दोन धावांची भर घातल्यानंतर भारत-अ चा डाव संपुष्टात आला. त्यानंतर भारत-ड चा डाव खालील अहमद व अकिब खान यांच्या गोलंदाजीने 183 धावांमध्ये संपुष्टात आला. भारत-ड च्या देवदत्त पडिकलने एकाकी झुंज दिल्याने किमान संघाला किमान 150 धावांचा टप्पा पार करता आला. देवदत्त पडिकलने 125 चेंडूत 15 चौकरांच्या साहाय्याने 92 धावांची खेळी केली. त्याला रिकी भोईने 23 व हर्षित राणाने 31 धावा करून साथ देण्याचा प्रयन्त केला. मात्र, इतर फलंदाजांनी घोर निराशा केली.
Stumps Day 2: India A – 115/1 in 28.1 overs (Mayank Agarwal 56 off 87, Pratham Singh 59 off 82) #IndAvIndD #DuleepTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 13, 2024
खालील अहमद व अकिब खान यांनी प्रत्येकी 3 तर प्रसिद्ध कृष्णा, तनुष कोटियन व शम्स मुलाणी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुसऱ्या डावात भारत-अ संघाने दिवसअखेर 1 बाद 115 अशी दमदार सुरुवात केली. कर्णधार मयांक अगरवाल 8 चौकारांसह 56 धावांची खेळी करून बाद झाला. सलामीवीर प्रथम सिंगने नाबाद 59 धावांची खेळी केली. दिवसअखेर भारत अ संघाकडे 222 धावांची महत्वपूर्ण आघाडी आहे.
भारत-ब कडून चोख प्रत्युत्तर…
पहिल्या दिवशीच्या 5 बाद 327 पासून पुढे खेळताना भारत-क संघाने दुसऱ्या दिवशी धावांचा डोंगर उभारला. काल नाबाद असणारे ऋतुराज गायकवाड (46) व मानव सुथर (08) यांनी पुढे खेळायला सुरुवात केली. ऋतुराजने 58 धावांची खेळी केली. मानव सुथरने 156 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार व 3 षटकारांच्या साहाय्याने 82 धावांची दमदार खेळी केली. त्याला अंशुल कंबोजने 38 धावा करताना सुरेख साथ दिली.
Stumps Day 2: India B – 124/0 in 35.6 overs (A R Easwaran 51 off 91, N Jagadeesan 67 off 126) #IndBvIndC #DuleepTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 13, 2024
भारत-क संघाचा डाव 124.1 षटकांत सर्वबाद 525 धावांवर संपुष्टात आला. भारत-ब संघाकडून मुकेश कुमार व राहुल चहर यांनी प्रत्येकी 4, तर नितेशकुमार रेड्डी व नवदीप सैनी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारत-ब संघाने दमदार सुरुवात केली. सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन व नारायण जगदीसन यांनी अर्धशतके झळकावताना दिवसअखेर 124 धावा केल्या.
Duleep Trophy 2024 : ईशान किशनच्या शतकाने भारत-क मजबूत स्थितीत….
नारायण जगदीसनने 126 चेंडूत 8 चौकारांच्य साहाय्याने 67 तर अभिमन्यू ईश्वरनने 91 चेंडूत 4 चौकार व एका षटकाराच्या साहाय्याने 51 धावांची खेळी केली. उद्या लढतीचा तिसरा दिवस असुन भारत-ब संघ 401 धावांनी पिछाडीवर आहे.





