Maharashtra Election : विधानसभेत महायुतीला ‘या’ गोष्टींमुळे बसू शकतो फटका; वाचा इनसाईड स्टोरी

राज्यात विधानसभा निवडणूकांसाठी बहुतांश पक्षांकडून हळूहळू उमेदवारांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय वर्तुळात विधानसभेचे वारे वाहत असून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यादरम्यान महायुतीमधील धुसफूस मागच्या काही दिवसांपासून चव्हाट्यावर आली आहे. याचा फटका महायुतीला येत्या विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. यामागची नेमकी कारणे काय आहेत जाणून घेऊया…
1) लडकी बहीण योजनेवरून वाद
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राबवताना सत्ताधारी पक्षांत पक्षात समन्वयाचा अभाव दिसत आहे. याचा फटका त्यांना विधानसभेत बसू शकतो.
2) शब्द वगळला
लाडकी बहिण योजनेत राष्ट्रवादी अजित पवार गट मुख्यमंत्री शब्द वगळला आहे तर एकनाथ शिंदे गटाने देखील अजित दादांना टार्गेट केले आहे.
3) विकासकामे ठप्प
लाडकी बहीण योजनेसाठी विकास कामांचा निधी वेगळा काढावा लागला आहे. त्यामुळे बहुतेक विकासकामे ठप्प झाली असून सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे.
4) छत्रपतींचा पुतळा
सिंधूदुर्ग जिल्हातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सत्ताधारी तिन्ही पक्षांत (भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट ) माफीनाम्यावर समन्वय नाही.
5) आरक्षण
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात पेटला आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक भूमिका घेताना दिसत आहेत तर बाकी दोन्ही मुख्यमंत्री शांततेची भूमिका घेताना दिसत आहेत.
6) जागा वाटप
महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठा घोळ होण्याची शक्यता आहे. कारण तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते परस्पर उमेदवार जाहीर करत सुटले आहेत. त्यामुळे जागावाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.
7) मुख्यमंत्रीपदाचा चेहरा
महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहरा कोण असणार यावरून वाद सुरू आहे. यामुळे महायुतीमधील गणित बिघडण्याची शक्यता आहे.





