दारूच्या नशेत अभिनेत्रीचा पोलिसांसोबत राडा

मुंबई – टीव्ही आणि सिनेअभिनेत्री रुही सिंहने सोमवारी रात्री दारूच्या नशेत चार दुचाकी आणि तीन कारना धडक दिली. तसेच तिने राडा घालत पोलीस कॉन्स्टेबलच्या वर्दीवरील बॅचही काढला. रुही सिंहवर सांताक्रूझ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यावेळीचा रुहीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
माहितीनुसार, रुही आपल्या दोन मित्रांसोबत घरी जात होती. लिंकिंग रोडवर पोहोचल्यानंतर तिघांपैकी एक जण फूड आऊटलेटमधील वॉशरुममध्ये जायचं होतं. पण आऊटलेट बंद असल्याचं सांगत स्टाफने त्यांना जाऊ दिलं नाही. यानंतर तिघांनी तिथे गोंधळ घालायला सुरुवात केली. दारुच्या नशेत असलेल्या रुहीने तिच्या कारने इतर गाड्यांना धडक दिली. यात सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही. स्टाफपैकी एकाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. यानंतर रुहीने पोलिसांसोबत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तिच्या दोन्ही मित्रांना तातडीने अटक केली. तसेच रात्र असल्याने रुहीवर अटकेची कारवाई करण्यात आली नाही.
https://www.instagram.com/p/BvuVX81nxkJ/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, रुही सिंह कॅलेंडर्स गर्ल्स, मॉडेल आणि इश्क फोरेवर या चित्रपटांमध्ये काम केले आहे.





