पाकिस्तानी विद्यापीठात सर्वात मोठं ड्रग्ज आणि सेक्स स्कँडल, विद्यार्थिनींचे 5500 अश्लील व्हिडिओ आले समोर !

Updated On:
पाकिस्तानी विद्यापीठात सर्वात मोठं ड्रग्ज आणि सेक्स स्कँडल, विद्यार्थिनींचे 5500 अश्लील व्हिडिओ आले समोर !

पाकिस्तानमध्ये एक मोठे सेक्स स्कँडल समोर आले आहे. याला जगातील सर्वात मोठे सेक्स स्कँडल देखील म्हटले जात आहे, ज्यामध्ये 5500 महाविद्यालयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. पाकिस्तानचे हे स्कॅ्ंडल जगभर चर्चेचा विषय बनले आहे. पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने (HEC) इस्लामिया विद्यापीठ बहावलपूर (IUB) या स्कॅंडलची चौकशी करण्यासाठी एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीत तीन कुलगुरू आणि सुरक्षा एजन्सीचे अधिकारी सहभागी असणार आहे.

दरम्यान, या स्कॅंडलशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ समोर आले आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये एक मुलगी कारमधून बाहेर पडून एका खोलीकडे जाताना दिसत आहे. एक व्यक्ती या मुलीला घेऊन येतो आणि घटनेचा व्हिडिओ बनवला जातो. ही पीडित मुलगी अशा हजारो मुलींपैकी एक आहे जिला आधी अंमली पदार्थांचे व्यसनी बनवले गेले आणि नंतर अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करून तीच्याकडून हवे ते करायला लावले.

इस्लामिया विद्यापीठातील प्रकरण –

हे प्रकरण पाकिस्तानच्या इस्लामिया विद्यापीठ बहावलपूरशी संबंधित आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ड्रग्ज आणि लैंगिक शोषणाचे हे विद्यापीठ अड्डा बनले आहे. तपासात आरोपीच्या मोबाईलमधून अनेक पुरावे सापडले असून त्यात अनेक व्हॉट्सअॅप चॅटचे अश्लील व्हिडिओ आहेत. यावरून हा घाणेरडा खेळ अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे सिद्ध होते. एजाज हुसेन नावाचा एक व्यक्ती या संपूर्ण घोटाळ्यात मुख्य आरोपी आहे. त्याची टोळी अश्लील व्हिडिओ बनवून हजारो मुलींचे शोषण करत होती, असा प्राथमिक तपासात समोर आले आहे.

असे उघड झाले स्कॅंडल –

इस्लामिया युनिव्हर्सिटी बहावलपूरचे वित्त संचालक अबू बकर याच्या अटकेनंतर पोलिसांना या मोठ्या सेक्स स्कँडलची माहिती मिळाली. अबू बकरला 28 जून रोजी एका मुलीसोबत संशयास्पद स्थितीत पकडले होते. चौकशीत त्याच्याकडून 10 ग्रॅम चरस आढळून आला. त्याच्या मोबाईलमध्ये हजारो अश्लील व्हिडिओ सापडले असून, त्याद्वारे तो महाविद्यालयीन तरुणींचे शोषण करत होता. यानंतर निवृत्त मेजर एजाज हुसैन यांना पकडण्यात आले, जो महाविद्यालयाचा सुरक्षा अधिकारी आहे.

आतापर्यंत 3 जणांना अटक –

याप्रकरणी आतापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून हे स्कॅंडल सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. एजाज हुसेनच्या सांगण्यावरून त्या मुलींना टार्गेट करण्यात आले ज्यांना घराबाहेर काढण्यात आले आणि गरीब होत्या. अशा मुलींना शिष्यवृत्तीचे आमिष दाखवून फी माफ करण्याच्या बहाण्याने फसवले. पोलिसांना आतापर्यंत विद्यार्थिनींचे 5500 व्हिडिओ मिळाले आहेत. मुलींना वाचवणे हे आमचे काम नाही, असे पोलीस सांगत आहेत.

विद्यापीठातून ड्रग्जची अनेक प्रकरणे आली समोर –

पाकिस्तानमध्ये अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. मात्र प्रत्येक वेळी विद्यापीठाच्या अब्रूचे कारण देऊन आरोपींच्या कृत्यांवर पांघरूण घातले जाते. पाकिस्तानच्या बहावलपूर विद्यापीठात 113 विद्यार्थ्यांच्या ड्रग्जच्या नोंदी समोर आल्या आहेत. मात्र त्यानंतरही ठोस कारवाई झाली नाही. याचा परिणाम सर्वांसमोर आहे. येथे मुलींना ड्रग्ज देऊन त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत.

शिक्षण क्षेत्र त्रस्त: एचईसी अध्यक्ष –

वृत्तसंस्थेनुसार, एचईसीचे अध्यक्ष मुख्तार अहमद यांनी नॅशनल असेंब्लीच्या स्थायी समितीला सांगितले की, विद्यापीठातील घोटाळ्यामुळे शिक्षण क्षेत्राचे नुकसान होत आहे. सदर घटनेची चौकशी करण्यासाठी ही समिती काही दिवस विद्यापीठात राहणार आहे. देशात 253 विद्यापीठे (सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही) असून या समस्येमुळे विद्यार्थी त्रस्त आहेत.

विद्यापीठाच्या सर्व डीनचे फॉरेन्सिक ऑडिट करावे : उपनिबंधक

उपनिबंधकांनी समितीला सांगितले की, आययूबीच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. समितीने आययूबीच्या व्यवस्थापनाला पुढील बैठकीत तपशील सादर करण्याचे निर्देश दिलेत. आतापर्यंत विद्यापीठ व्यवस्थापनाने संपूर्ण चौकशी करायला हवी होती, मात्र तसे करण्यात अपयश आले असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीने फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला सहभागी करून घ्यावे, असे सदस्यांनी सांगितले आणि विद्यापीठाच्या सर्व डीनचे फॉरेन्सिक ऑडिट एफआयए सायबर विंगने केले पाहिजे, असेही सांगण्यात आले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Shirur News : शिरुरमध्ये ‘एमडी’ ड्रग्जचा वाढता सावट; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

2026-05-20 18:38:34

Shirur News : शिरुरमध्ये ‘एमडी’ ड्रग्जचा वाढता सावट; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Mumbai News : मुंबईमध्ये मोठी कारवाई ! 100 कोटींचा एमडी बनवण्याचा कच्चा माल जप्त

2026-05-12 21:41:52

Mumbai News : मुंबईमध्ये मोठी कारवाई ! 100 कोटींचा एमडी बनवण्याचा कच्चा माल जप्त

Mumbai Drugs Case: मोठी बातमी ! मुंबईतून 1745 कोटी रुपये किंमतीचे तब्बल 349 किलो अमली पदार्थ जप्त ; अमित शाह म्हणाले,"बॉटम टू टॉप' तपासाचं"

2026-05-01 12:36:42

Mumbai Drugs Case: मोठी बातमी ! मुंबईतून 1745 कोटी रुपये किंमतीचे तब्बल 349 किलो अमली पदार्थ जप्त ; अमित शाह म्हणाले,"बॉटम टू टॉप' तपासाचं"

Mumbai News: हाय-प्रोफाईल पार्टीवर पुन्हा प्रश्नचिन्ह; मुंबईच्या कॉन्सर्टमधील धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश

2026-04-14 12:03:30

Mumbai News: हाय-प्रोफाईल पार्टीवर पुन्हा प्रश्नचिन्ह; मुंबईच्या कॉन्सर्टमधील धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश

Nashik Crime : नाशिकमध्ये 'खरात पार्ट 2'; ऑफिसबॉयनेच मालकाला अडकवलं, महिलांचे 121 अश्लील व्हिडिओ उघडकीस

2026-04-04 18:47:19

Nashik Crime : नाशिकमध्ये 'खरात पार्ट 2'; ऑफिसबॉयनेच मालकाला अडकवलं, महिलांचे 121 अश्लील व्हिडिओ उघडकीस