Drug Trafficking : आंतरराज्यीय अमली पदार्थाच्या तस्करीवर कारवाई; 2 जणांना अटक
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करीच्या (Drug Trafficking) जाळ्याविरुद्ध केलेल्या दोन कारवायांमध्ये एक किलो चरस, कोडीन-युक्त खोकल्याच्या औषधाच्या (सिरप) १५,००० हून अधिक बाटल्या आणि १२,००० हून अधिक ट्रॅमाडोल गोळ्या जप्त केल्या आहेत.

Drug Trafficking : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करीच्या (Drug Trafficking) जाळ्याविरुद्ध केलेल्या दोन कारवायांमध्ये एक किलो चरस, कोडीन-युक्त खोकल्याच्या औषधाच्या (सिरप) १५,००० हून अधिक बाटल्या आणि १२,००० हून अधिक ट्रॅमाडोल गोळ्या जप्त केल्या आहेत. यामध्ये एका पुरुषाला आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
ट्रॅमाडोल आणि कोडीन सिरप ही डॉक्टरांच्या सल्ल्याने (प्रिस्क्रिप्शनवर) दिली जाणारी ओपिओइड औषधे आहेत. त्यांचा वैद्यकीय वापर कायदेशीर असला तरी, वैद्यकीय देखरेखीशिवाय सेवन केल्यास त्यांचा गैरवापर होऊ शकतो. ट्रॅमाडोलचा परिणाम मध्यवर्ती मज्जासंस्थेवर होतो आणि त्याचा वापर वेदना कमी करण्यासाठी केला जातो; तर कोडीनमुळे व्यसन लागू शकते आणि मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो.
तसेच, अतिसेवन झाल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. बुधवारी घाटकोपर भागात एका महिलेच्या घरी घरगुती सामानामध्ये लपवून ठेवलेले १.०६ किलो चरस एनसीबीने जप्त केले.
दुसऱ्या एका कारवाईत, ८ ऑगस्ट रोजी गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या एका प्रवासी बसमधून कोडीन-युक्त खोकल्याच्या औषधाच्या १,०८० बाटल्या (एकूण वजन १०८ किलो) एनसीबीने जप्त केल्या आणि एका अमली पदार्थ तस्कराला अटक केली.
एनसीबीने वितरक आणि त्याचे वडोदरा (गुजरात) येथील गोदाम शोधून काढले, तिथे खोकल्याच्या औषधाच्या आणखी १३,९३८ बाटल्या आणि १२,२४० ट्रॅमाडोल गोळ्या जप्त करण्यात आल्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने मिळणाऱ्या या औषधांचा मार्ग बदलण्यासाठी वापरली जाणारी बनावट बिलेही यावेळी हस्तगत करण्यात आली. या सिरपच्या अनेक बाटल्यांवरील बॅच नंबर्सशी छेडछाड करण्यात आली होती.






