Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू जाणार ‘या’ 3 देशांच्या दौऱ्यावर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) उद्या (दि.१९) पासून २५ जुलै दरम्यान मोल्दोव्हा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानियाच्या दौऱ्यावर जाणार असून, भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे आणि व्यापक पूर्व युरोपीय प्रदेशासोबतचा सहभाग अधिक सखोल करणे हा या दौऱ्यांचा उद्देश आहे.

Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) उद्या (दि.१९) पासून २५ जुलै दरम्यान मोल्दोव्हा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानियाच्या दौऱ्यावर जाणार असून, भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे आणि व्यापक पूर्व युरोपीय प्रदेशासोबतचा सहभाग अधिक सखोल करणे हा या दौऱ्यांचा उद्देश आहे.
अध्यक्ष माईया सँडू यांच्या निमंत्रणावरून राष्ट्रपती (Droupadi Murmu) २० जुलै रोजी मोल्दोव्हाच्या दौऱ्याने आपल्या दौऱ्याची सुरुवात करतील. भारतीय राष्ट्रपतींचा मोल्दोव्हाचा हा पहिलाच दौरा असणार आहे. आपल्या दौऱ्यादरम्यान, राष्ट्रपती मुर्मू या मोल्दोवाचे अध्यक्ष सँडू यांच्यासोबत शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करतील आणि मोल्दोव्हा प्रजासत्ताकाच्या संसदेचे अध्यक्ष इगोर ग्रोसू यांची भेट घेतील.
दिनांक २१ ते २२ जुलै दरम्यान, मॅसेडोनियाचे अध्यक्ष गोर्डाना सिल्यानोव्स्का-डावकोवा यांच्या निमंत्रणावरून राष्ट्रपती मुर्मू (Droupadi Murmu) उत्तर मॅसेडोनियाच्या दौऱ्यावर असतील. तसेच, कोणत्याही भारतीय राष्ट्रपतींचा उत्तर मॅसेडोनियाला होणारा हा पहिलाच दौरा असेल.
भारत आणि उत्तर मॅसेडोनिया कृषी, औषधनिर्माण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि आयटी-आधारित सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यास उत्सुक आहेत, असे परराष्ट्र मं६लयाने म्हटले आहे. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात, रोमानियाचे अध्यक्ष निकुसोर डॅन यांच्या निमंत्रणावरून राष्ट्रपती मुर्मू २३ ते २५ जुलै दरम्यान रोमानियाला भेट देतील.
अध्यक्ष मुर्मू (Droupadi Murmu) या अध्यक्ष डॅन, अंतरिम पंतप्रधान इली बोलोजान, सिनेटचे अध्यक्ष मिर्सिया अब्रुडियन आणि चेंबर ऑफ डेप्युटीजचे अध्यक्ष सोरिन ग्रिंडियानू यांच्यासोबत बैठका घेतील. त्या रोमानिया-भारत संसदीय मैत्री गटाच्या सदस्यांशी संवाद साधतील, भारत-रोमानिया व्यवसाय मंचाला संबोधित करतील आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांना भेटतील.






