Nevasa News : सुलतानपूरात कृषिदूतांचा ड्रोनद्वारे फवारणी उपक्रम: शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन

नेवासा : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय, सोनईच्या चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुलतानपुर (ता. नेवासा) या गावात सध्या कार्यरत आहेत.
या कार्यक्रमांतर्गत ड्रोनद्वारे फवारणी असा उपक्रम कृषिदूतांनी यावेळी राबवला. यामुळे शेती अधिक आधुनिक आणि कार्यक्षम होते. ड्रोनचा वापर करून कीटकनाशक, रोगनाशक आणि खतांची फवारणी केली जाते. ड्रोन वापरल्याने वेळ आणि मजुरीची बचत होते. फवारणी अचूक आणि समान प्रमाणात होते.
मजुरांच्या आरोग्याला धोका न देता सुरक्षित फवारणी डोंगराळ भागात किंवा जलद कामासाठी उपयुक्त १० ते १५ मिनिटांत १ एकरावर फवारणी जमिनीच्या संपर्काशिवाय हवेवरून फवारणी करणे शक्य होते. तसेच पाण्याची आणि औषधांची बचत ३०-५० टक्केपर्यंत होते. मजुरांची आवश्यकता कमी भासते आणि उष्णतेमध्येही कार्यक्षम ठरते, असे ड्रोनचे अनेक फायदे कृषिदूतांनी यावेळी शेतकऱ्यांना पटवून देत मार्गदर्शन केले.
तसेच सुलतानपूर गावचे प्रगतशील शेतकरी संभाजी शहादेव खाटीक यांच्या पपई पिकावर ड्रोनद्वारे फावरतांनी प्रत्याक्षिक दिले. हा उपक्रम कृषीदूत वरूण गारुळे, निखिल दिघे, आदित्य लोंढे, ओंकार कामठे, रुपेश कदम, युवराज हाके यांनी राबवाला हा उपक्रम प्राचार्य डॉ. हरी मोरे, उपप्राचार्य सुनील बोरुडे कार्यक्रम समन्वयक डॉ. अतुल दरंदले आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी घेण्यात आला.





