‘डिलिव्हरी बॉय’च्या जागी ‘ड्रोन’; बेंगळुरूमध्ये सात मिनिटांत ड्रोनद्वारे होम डिलिव्हरी सेवा!

बंगळुरू – बंगळुरू शहरांमध्ये आता व्यावसायिक ड्रोन सेवा सुरू झाली आहे. यामुळे बंगळुरू येथील इस्पितळांना आणि नागरिकांना एखादी वस्तू किंवा महत्त्वाचे औषध केवळ सात मिनिटात घरपोच मिळणार आहे. या ड्रोनच्या माध्यमातून दहा किलो पर्यंतचे वजन वाहून नेता येऊ शकते.
तीन वर्षांपूर्वी बंगळूरूतील तीन ईस्पीतळानी महत्त्वाची उपकरणे आणि औषधे वाहून नेण्यासाठी ड्रोन सेवेचा आधार घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर या विषयावर काम चालू होते. आता प्रत्यक्षातही सेवा सुरू झाली आहे.
ही ड्रोन सेवा सुरू करणार्या स्काये एअर या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित कुमार यांनी सांगितले की, सध्या ही सेवा दोन महत्त्वाच्या भागात चालू आहे. ऑर्डर मिळाल्यानंतर सात मिनिटात संबंधित वस्तू ग्राहकांना घरपोच केली जाऊ शकणार आहे. या अगोदरच गुरगाव शहरांमध्ये अशा प्रकारची सेवा सुरू झाली आहे. यामुळे वाहतुकीचा कसलाही अडथळा निर्माण न होता वस्तूचा पुरवठा केला जाऊ शकतो. गेल्या एक वर्षात गुरगावमध्ये दहा लाख वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे.





