Drone attack on Bulgarian boats : बल्गेरियाच्या 2 बोटींवर ड्रोनद्वारे हल्ला
काळ्या समुद्रात बल्गेरियाच्या विशेष आर्थिक क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या दोन व्यापारी जहाजांवर (Drone attack on Bulgarian boats) मंगळवारी ड्रोन हल्ले करण्यात आले.

Drone attack on Bulgarian boats : काळ्या समुद्रात बल्गेरियाच्या विशेष आर्थिक क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या दोन व्यापारी जहाजांवर (Drone attack on Bulgarian boats) मंगळवारी ड्रोन हल्ले करण्यात आले.
बल्गेरियाचे पंतप्रधान रुमेन रादेव यांनी ही माहिती दिली असून बल्गेरियाच्या विशेष आर्थिक क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांवर असे हल्ले होणे अमान्य असल्याचे म्हटले आहे. हे हल्ले आंतरराष्ट्रीय कायदा आणि सागरी कायद्याचे उघड उल्लंघन असल्याचेही रादेव यांनी म्हटले आहे.
या हल्ल्यांनंतर बल्गेरियाच्या सरकारने (Drone attack on Bulgarian boats) आपत्कालिन बैठक बोलावली होती. त्यानंतर रादेव यांनी या हल्ल्यांची माहिती दिली. बल्गेरियाच्या समुद्रकिनाऱ्यापासून १२८ सागरी मैल अंतरावरच्या या जहाजांवर रात्री ३ वाजण्याच्या सुमारास समुद्रातून आणि हवेतून ड्रोन डागण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या हल्ल्यादरम्यान टोगोचा ध्वज असलेल्या अल्फा वतन जहाजाचे गंभीर झाले आणि ते घटनास्थळीच बुडाले.
या जहाजावरच्या कर्मचाऱ्यांबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. हल्ल्यानंतर पलाऊचा ध्वज असलेल्या एबल नावाच्या दुसऱ्या जहाजाला आग लागली. बल्गेरियाच्या एका अन्य बोटीने या जहाजावरच्या सर्व १८ कर्मचाऱ्यांची सुटका केली. पण दोन कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना वार्ना या बंदरातील रुग्णालयात हेलिकॉप्टरने हलवण्यात आले असल्याचे रादेव यांनी सांगितले.
हा ड्रोन हल्ला (Drone attack on Bulgarian boats) कोणी केला होता, हे त्वरित समजू शकलेले नाही. एबल जहाजावरून देशाच्या दक्षिणेकडे गव्हाची वाहतूक केली जात होती. तर अल्फा वतन जहाज उत्तरेकडे जात होते. या जहाजाच्या बुडण्यामुळे तेलाची गळती किंवा संभाव्य पर्यावरणीय नुकसानीचा आढावा घेण्याचे आदेश रादेव यांनी दिले आहेत.






