Drishyam 3 Box Office : ‘दृश्यम 3’ची कमाई सुसाट! बॉक्स ऑफिसवर जमवला कोट्यवधींचा गल्ला, जाणून घ्या कलेक्शन
Drishyam 3 Box Office : सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने आठव्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी १४,५८३ शोमधून सुमारे १४.५० कोटी रुपयांची कमाई केल्याचे वृत्त आहे.

Drishyam 3 Box Office : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील यशस्वी घोडदौड सुरूच आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाही चित्रपटाने दमदार कमाई करत बॉक्स ऑफिसवरील आपला दबदबा कायम ठेवला आहे.
समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘दृश्यम ३’ने जगभरात ४०० कोटी रुपयांचा मोठा टप्पा ओलांडला असून चित्रपटाचे एकूण कलेक्शन ४०७ कोटी रुपयांवर पोहोचल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता हा चित्रपट ५०० कोटींचा आकडा गाठणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने आठव्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी १४,५८३ शोमधून सुमारे १४.५० कोटी रुपयांची कमाई केल्याचे वृत्त आहे. या आकडेवारीनुसार, चित्रपटाचे भारतातील नेट कलेक्शन २६० कोटी रुपये, तर एकूण देशांतर्गत कलेक्शन ३१२ कोटी रुपयांपर्यंत पोहचले आहे.
दुसरीकडे, परदेशातील कमाईनेही चित्रपटाच्या एकूण कलेक्शनमध्ये भर घातली आहे. परदेशात आठव्या दिवशी सुमारे ६ कोटी रुपयांची कमाई झाल्याचा आणि एकूण परदेशी कलेक्शन ९५ कोटी रुपयांवर पोहोचल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
या आकडेवारीनुसार, चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई ४०७ कोटी रुपयांवर गेल्याचे सांगितले जात आहे. ‘दृश्यम ३’चे बजेट अंदाजे ११० कोटी रुपये आहे. चित्रपटाने आपल्या बजेटच्या तुलनेत मोठी कमाई केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२६ मधील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘दृश्यम ३’ पाचव्या स्थानावर आहे. या यादीत ‘हनुमान अंश’, ‘धुरंधर २’, ‘आवारापन २’ आणि ‘मिर्झापूर द मूव्ही’ या चित्रपटांचा समावेश आहे.






