DRDOच्या अधिकाऱ्याला हेरगिरीबद्दल अटक
Updated On:

बालासोर –संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वरिष्ठ अधिकाऱ्याला शुक्रवारी हेरगिरीच्या आरोपावरून अटक करण्यात आली. तो संरक्षण क्षेत्राशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानी हेराला पुरवत असल्याचा संशय आहे. अटक करण्यात आलेला 57 वर्षीय अधिकारी ओडिशातील डीआरडीओच्या चांदीपूर तळावर रूजू होता. त्याचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्याच्या विरोधात स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
त्याआधारे पोलिसांनी अधिकाऱ्याला अटक केली. तो पाकिस्तानी हस्तकाला सोशल मीडियावरून माहिती पुरवत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. डीआरडीओचा अधिकारी प्रामुख्याने आर्थिक लाभासाठी क्षेपणास्त्र चाचण्यांविषयीची माहिती उघड करत होता. त्याच्या नापाक कारनाम्यांची तपशीलवार माहिती कसून चौकशीनंतर समोर येण्याची शक्यता आहे.





